कसा कराल हार्ट अटॅकला प्रतिबंध

1342
views

कसा कराल हार्ट अटॅकला प्रतिबंध..?
हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱया कारणांपासून दूर राहिल्यास हार्ट अटॅक येण्यापासून दूर राहता येते. यासाठी,
◦ धुम्रपान, तंबाखू, मद्यपान इ. व्यसनांपासून परावृत्त व्हावे. शारीरीकदृष्ट्या सक्रिय रहावे,
◦ नियमित व्यायाम, योगासने करावित,
◦ दररोज किमान 30-45 मिनिटे व्यायामासाठी द्यावित,
◦ वजन नियंत्रणात ठेवावे,
◦ सॅच्युरेटेड फैट्स, अतितेलकट पदार्थ, खारट, गोड पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे,
◦ आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, तंतुमय पदार्थांचा समावेश अधिक करावा,
◦ नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी,
◦ नियमित रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेची तपासणी करुन घ्यावी,
◦ नियमित रक्तदाबाची तपासणी करुन घ्यावी,
◦ उच्चरक्तदाब, मधुमेह आणि स्थुलता हे विकार असल्यास त्यांवर तज्ञांद्वारा योग्य उपचार करुन घ्यावेत,
◦ मधुमेह, उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवावे,
◦ मानसिक ताणतणाव रहित रहावे. या उपायांचे अवलंब केल्यास हृद्यविकारापासून दूर राहता येते.
How to prevents Heart attack tips in Marathi


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.