हार्ट अटॅकची संपूर्ण माहिती मराठीत (Heart Attack in Marathi Information)

158
views

Heart attack in Marathi, heart attack all of in Marathi language.

heart attack in marathi, precaution for heart attack in marathi, heart attack prevention in marathi, heart attack first aid in marathi, heart information in marathi language, heart failure meaning in marathi, heart system marathi information, heart attack meaning in marathi, heart attack lakshane karne upchar nidan se bachne ke upay in marathi, symptoms of heart attack in marathi, हृदयविकार ओळखायचा कसा, हृदयविकार का होतो, हृदयविकाराची लक्षणे, कारणे आणि उपाय- Heart attack Symptoms in marathi, heart attack causes in marathi, heart attack diagnosis test in marathi, heart checkup test in marathi, heart attack Treatment in marathi, heart attack information in Marathi, Angiography information in marathi, Angioplasties in Marathi, Angioplasty in Marathi, bypass surgery in Marathi, cost Details pune, nagpur, mumbai, maharashtra, kolhapur, nashik, या लक्षणांनी ओळखा तुम्हांला हार्ट अटॅक आलाय, Heart attack karane in marathi, heart attack lakshane in marathi, nidan heart Treatment, Ayurveda, homeopathy, operation, upchar, herbal medicine gharelu upchar, yogasane excersise tips, aerobic excersise, heart attack diet tips, heart attack and diabetes, stroke paralysis, हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅकची कारणे, का येतो हार्ट अटॅक, लक्षणे निदान उपचार माहिती, व्यायाम आणि हार्ट अटॅक, आहार चार्ट तक्ता, कोणता आहार घ्यावा, हार्ट अटॅकपासून दूर कसे राहावे, पथ्य अपथ्य, घरगुती उपाय, heart attack solution in marathi, heart attack chi lakshan in marathi, heart attack chi karane in marathi, हार्ट अटॅक म्हणजे काय, Heart attack chi mahiti Marathi, madhye heart information details in marathi language, heart attack free book pdf file ppt video, हार्ट अटॅक येण्याची कारणे, हार्ट अटैक से बचने के उपाय, हार्ट अटैक ट्रीटमेंट दिल का दौरा पड़ने से पहले लक्षण, क्यों दिल का दौरा पड़ने की बात आती है, महिलाओं में हार्ट अटैक के लक्षण, हृदयविकाराचा झटका, हार्ट अटैक ची लक्षणे

हार्ट अटॅक एक प्रमुख आरोग्य समस्या :
हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येणे हा आज एक प्रमुख आजार बनला आहे. हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण आजकाल चिंताजनकरित्या वाढलेले आहे. कारण पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा हार्ट अटॅक आज 25 ते 30 वयापुर्वीच युवकांमध्येही अधिक प्रमाणात आढळत आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा- शारिरीक श्रमाचा अभाव, मानसिक तानतणाव, अयोग्य आहार या प्रमुख कारणांमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. परीणामी अकाली मृत्युचेही प्रमाण वाढत आहे.

कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक..?
Heart attack risk factors in Marathi.
हार्ट अटॅकचे संभाव्य धोक्याचे घटक :
• वयाच्या 25 वर्षानंतरच्या व्यक्ती,
• ‎लठ्ठपणा, मधुमेह, धमनीकाठिन्यता, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, मानसिक ताण या विकारांनी पिडीत व्यक्ती,
• ‎हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे, कुटुंबातील आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो.
• ‎धुम्रपान, मद्यपान, तंबाखु, अमली पदार्थ इ. च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

का येतो हार्ट अटॅक..?
Heart attack causes in Marathi, Heart Attack kaane marathit, हार्ट अटॅकची कारणे
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

अशी कोणकोणती कारणे आहेत की ज्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो..?
हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळ्याची कारणे :

(1) धमनीकठिण्य किंवा अॅथोरोक्लेरोसिस (Atherosclerosis) – धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. यामध्ये हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात, त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृद्यास होणाऱया रक्त आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, धूम्रपान-मद्यपान ह्यासारखी व्यसने यासारखी कारणे धमनीकठिण्यता (अॅथोरोक्लेरोसिस) निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.
(2) रक्ताची गुठळी होणे – काहीवेळा हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये अचानक रक्ताची गुठळी तयार होते. त्या गुठळीच्या अडथळ्यामुळे हृदयास योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही परिणामी हार्ट अटॅक येतो. अशा प्रकारे झटका येण्याचे प्रमाण तरुण वयामध्ये जास्त आहे.
(3) काहीवेळेस रक्तातील गुठळी रक्तप्रवाहाबरोबर हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊनही अडथळा निर्माण करते.
(4) हृदयास रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अचानक आंकुचन पावल्यामुळेही हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो.

हार्ट अटॅकची कारणे :
बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे आज हृद्यविकार 25 ते 30 वयामध्येसुद्धाही आढळत आहे. त्यातही धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण बनले आहे. यामध्ये हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात, त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृद्यास होणाऱया रक्त आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.

हार्ट अटॅकला सहाय्यक ठरणारी अन्य कारणे :
Heart attack causes in marathi
• हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे,
• ‎मधुमेह, धमनीकठिण्यता, उच्च रक्तदाब या विकारांनी पीडित रुग्ण,
• ‎रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे,
• ‎लठ्ठपणा,
• ‎बैठी जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्ती,
• ‎व्यायाम आणि शारीरिक श्रमाच्या अभावामुळे,
• ‎मानसिक ताणतणावामुळे,
• ‎अयोग्य आहाराचे सेवनाने, सैच्युरेटेड फॅट्सचा आहारतील अधिक सेवनाने. चरबीजन्य पदार्थ, तेलकट, तूपकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, बेकरी पदार्थ, हवाबंद पाकीटे, शीतपेये, खारट पदार्थ यांच्या अतिरेकामुळे,
• ‎हिरव्या पालेभाज्या, तंतूमय पदर्थांच्या आहारतील कमतरतेमुळे,
• ‎धुम्रपान, मद्यपान, तंम्बाखु इ. व्यसन करणे ही कारणे हार्ट अटॅक येण्यास कारणीभूत ठरतात.


विशेष सूचना (कॉपी पेस्ट संबंधी) : ही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अनेकजण आमची उपयुक्त माहिती आमच्या परवानगी शिवाय कॉपी पेस्ट करून विडिओ, फेसबुक वैगरेवर आपल्या नावाने प्रसिद्ध करीत आहेत. तसा प्रकार आढळल्यास कॉपीराईट कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी ही सूचना दिली आहे. © कॉपीराईट हेल्थमराठी डॉट कॉम.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

कोणकोणत्या लक्षणांसह येतो हार्ट अटॅक :
Heart attack symptoms in marathi
अचानक छातीत वेदना सुरु होणे हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. छातीत होणाऱ्या त्या वेदनांना Angina (हृद्यशूल) असे म्हणतात. हार्ट अटॅकमध्ये खालील लक्षणे जाणवू शकतात.
• छातीत दडपल्यासारखे वाटते,
• ‎छातीत दुखायला लागते,
• ‎छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
• ‎बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
• ‎अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
• ‎अशक्तपणा जाणवणे,
• ‎उलटी किंवा मळमळ होणे,
• ‎चक्कर येणे,
• ‎दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
• ‎श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटैकमध्ये जाणवतात.

ही लक्षणे दिसू लागल्यास काय करावे..?
• धावपळ, हालचाल करू नका.
• ‎आपल्या मदतीस कोणाला तरी बोलावून घ्यावे.
• ‎अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी जवळ असतील तर ती गोळी घेऊन जिभेखाली ठेवावी. या गोळ्यांमुळे रक्त पातळ होते व रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होतो. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हृद्याच्या स्नायुंना होतो.
• ‎तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.

जर पेशंट बेशुद्ध असल्यास तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी आणि रुग्णावर सीपीआर उपाय करावेत. यामध्ये पेशंटला दुसरी एखादी व्यक्ती आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास देते व बाहेरून हृदयाला छातीवर दाब दिला जातो. रुग्णवाहिका येइपर्यंत हे उपाय करत राहावेत. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते. प्रत्येकाने सीपीआर उपाय कशाप्रकारे करावेत हे डॉक्टरांकडून समजून घ्यावेत. सीपीआर पध्दतविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

हार्ट अटॅकमुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात :
Heart attack complication in Marathi
हार्ट अटॅकमुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच हार्ट अटॅक आल्याने उपद्रव स्वरुपात अनेक गंभीर विकार उद्भवतात. यांमध्ये,
• हृद्याचे अनेक विकार उद्भवणे,
• ‎हृद्य निकामी होणे (हार्ट फेल्युअर),
• ‎पक्षाघात येणे,
‎किडन्या निकामी होणे यासारखे अनेक दुष्परिणाम हार्ट अटॅकमुळे होत असतात.
यासाठी येथे क्लिक करा व हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट टिप्स आजचं जाणून घ्या.

हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात..?
Heart attack diagnosis test, checkup in marathi
• इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ECG किंवा EKG
• ‎स्ट्रेस टेस्ट
• ‎2D इकोकार्डिओग्राफी
• ‎अँजिओग्राफी (अँजिओग्राफी म्हणजे काय..? याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
• ‎रक्तदाब तपासणी, कोलेस्टेरॉल चाचणी, ब्लड शुगर तपासणी या शिवाय हृदयाला झालेली इजा समजण्यासाठी आता स्ट्रेस थॅलीनम, पेट स्कॅन किंवा एमआरआयसारख्या तपासण्याही कराव्या लागू शकतात.

हार्ट अटॅकवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत..?
Heart attack treatment option in marathi Angiography Angioplasties in Marathi bypass surgery in Marathi.
अँजिओप्लास्टी (स्टेंट बसवून) आणि बायपास सर्जरी ह्या दोन उपचार पध्दती हार्ट अटॅकवर उपलब्ध आहेत.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ निर्माण होते किंवा रक्तवाहिन्यांचा मार्ग अरुंद बनल्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो किंवा येण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी आपले डॉक्टर निदान करून रुग्णाची स्थिती, गुंतागुंतीची शक्यता विचारात घेऊन अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतील. अँजिओप्लास्टी करणे अजिबातच शक्य नसते किंवा धोक्याचे असते तेंव्हा तसेच अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास त्या रुग्णांमध्ये बायपासचा निर्णय घेतला जातो.

अँजिओप्लास्टी –
What is Angioplasty in Marathi
यामध्ये गुठळी झालेल्या रक्तवाहिनीत एक गाईड वायर ढकलली जाते आणि या वायरवरून एक फुगा जाऊन गुठळी असलेल्या ठिकाणी तो फुगवला जातो त्यामुळे गुठळीच्या ठिकाणी असलेले फॅटी पदार्थ चपटे होऊन रक्तवाहिनीच्या बाजूला सरकतात, रक्तवाहिनीची अरुंद झालेली पोकळी मोठी केली जाते. त्यामुळे धमनीतील अडथळा दूर होऊन हृद्याचा रक्तप्रवाह सुधारतो.

स्टेंट बसविणे –
अरुंद झालेली रक्तवाहिनी केवळ अँजिओप्लास्टी करून बाजुला सारल्यास कालांतराने तेथे पुन्हा फॅटी पदार्थ जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अँजिओप्लास्टी करतानाच रक्तवाहिनीत असलेला अडथळा काढून तेथे स्टेंट टाकावी जाते. स्टेंट म्हणजे एक प्रकारची स्प्रिंग असते. रक्तवाहिनीतील अडथळा किती मोठा आहे, त्यावर स्टेंटची लांबी निश्‍चित केली जाते.

यासाठी एका फुग्याद्वारे अँजिओप्लास्टी करून रक्तवाहिनी फुगवली जाते त्यांनतर दुसऱ्या एका फुग्यावर बसवलेला स्टेंट त्या रक्तवाहिनीत आत ढकलला जातो. हा फुगाही गुठळीच्या जागी फुगवला जातो आणि त्यावरील स्टेंट उघडली जाते. यामुळे रक्तवाहिनीच्या बाजूला सरकवले गेलेले फॅटी पदार्थ रक्तवाहिनीच्या आत जमा होण्यास अटकाव होतो.

बेअर मेटल आणि ड्रग इल्युटिंग असे ‘स्टेंट’चे दोन प्रकार आहेत. बेअर मेटल स्टेंटमुळे रक्तपेशी त्या स्टेंटच्या ठिकाणी जमा होऊन गुठळी बनण्याची शक्यता असते त्यामुळे आजकाल ‘ड्रग इल्युटिंग’ प्रकारचे ‘स्टेंट’ मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. ड्रग इल्युटिंग स्टेंटमधील औषधी घटकांमुळे रक्तपेशी या स्टेंटमध्ये जमा होत नाहीत. एकदा बसविलेला स्टेंट हा साधारण दहा ते पंधरा वर्षे चालतो.
अँजिओप्लास्टीसह स्टेंट बसवण्यासाठी रुग्णाला केवळ 3-4 दिवसच हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. आणि पुढील आठवडा विश्रांती घेऊन रुग्ण पूर्वी प्रमाणे आपली दैनदिन कामे करू शकतो. डॉक्टरांनी दिलेली औषधे चालू ठेवावीत. त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार, व्यायामाचे नियोजन ठेवावे व नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

बायपास सर्जरी –
अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास बायपास सर्जरीचा अवलंब केला जातो. यामध्ये हृद्याच्या स्नायुंना रक्तपुरवठा करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्या जोडल्या (ग्राफ्ट केल्या) जातात. नवीन रक्तवाहिन्या म्हणून छातीच्या आतमधील इंटर्नल मॅमरी ही रक्तवाहिनी ही जास्त प्रमाणात वापरली जाते. याशिवाय हाता किंवा पायातील रक्तवाहिन्यासुद्धा वापरली जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज बायपास शस्त्रक्रिया खूप सोपी आणि सहज झाली आहे. पूर्वीइतका वेळ आणि त्रास होत नाही. बायपास सर्जरीच्या ओपन हार्ट सर्जरी आणि बीटिंग हार्ट सर्जरी अशा दोन पद्धती आहेत.
नवीन रक्तवाहिनी जोडण्यासाठी बायपासमध्ये शस्त्रक्रिया करून रुग्णाची छाती उघडी करून तिथले हाड कापले जाते व नवीन रक्तवाहिनी जोडली जाते. किती ग्राफ्ट टाकतो आणि गुंतागुंत किती आहे यावर शस्त्रक्रियेचा वेळ अवलंबून असतो. बायपास सर्जरी साधारण 4-6 तासामध्ये पूर्ण होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दोन ते तीन दिवस ठेवले जाते. त्यानंतर दहा-बारा दिवस रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि पुढे महिनाभर रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असते. बायपास शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे रुग्ण जीवन व्यवस्थित जगू शकतो. दीड-दोन महिन्यानंतर आपल्या कामावर, नोकरीवर जाऊ शकतो. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे चालू ठेवावीत. त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार, व्यायामाचे नियोजन ठेवावे व नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. एकदा केलेली बायपास सर्जरी ही साधारण दहा ते बारा वर्षे व्यवस्थित कार्य करील.

हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट टिप्स जाणून घ्या.

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, Health Marathi Network

heart attack in marathi, precaution for heart attack in marathi, heart attack prevention in marathi, heart attack first aid in marathi, heart information in marathi language, heart failure meaning in marathi, heart system marathi information, heart attack meaning in marathi, heart attack lakshane karne upchar nidan se bachne ke upay in marathi, symptoms of heart attack in marathi, हृदयविकार ओळखायचा कसा, हृदयविकार का होतो, हृदयविकाराची लक्षणे, कारणे आणि उपाय- Heart attack Symptoms in marathi, heart attack causes in marathi, heart attack diagnosis test in marathi, heart checkup test in marathi, heart attack Treatment in marathi, heart attack information in Marathi, Angiography information in marathi, Angioplasties in Marathi, Angioplasty in Marathi, bypass surgery in Marathi, cost Details pune, nagpur, mumbai, maharashtra, kolhapur, nashik, या लक्षणांनी ओळखा तुम्हांला हार्ट अटॅक आलाय, Heart attack karane in marathi, heart attack lakshane in marathi, nidan heart Treatment, Ayurveda, homeopathy, operation, upchar, herbal medicine gharelu upchar, yogasane excersise tips, aerobic excersise, heart attack diet tips, heart attack and diabetes, stroke paralysis, हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅकची कारणे, का येतो हार्ट अटॅक, लक्षणे निदान उपचार माहिती, व्यायाम आणि हार्ट अटॅक, आहार चार्ट तक्ता, कोणता आहार घ्यावा, हार्ट अटॅकपासून दूर कसे राहावे, पथ्य अपथ्य, घरगुती उपाय, heart attack solution in marathi, heart attack chi lakshan in marathi, heart attack chi karane in marathi, हार्ट अटॅक म्हणजे काय, Heart attack chi mahiti Marathi, madhye heart information details in marathi language, heart attack free book pdf file ppt video, हार्ट अटॅक येण्याची कारणे, हार्ट अटैक से बचने के उपाय, हार्ट अटैक ट्रीटमेंट दिल का दौरा पड़ने से पहले लक्षण, क्यों दिल का दौरा पड़ने की बात आती है, महिलाओं में हार्ट अटैक के लक्षण, हृदयविकाराचा झटका, हार्ट अटैक ची लक्षणे

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.