केसात खाज होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय – Hair itching solution in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

केसात खाज होणे – Itchy scalp :

केसांमध्ये खाज होण्याची समस्या अनेकांना असते. केसात अनेक कारणांनी खाज होऊ शकते. प्रामुख्याने केसातील कोंडा, उवा, इन्फेक्शन, ऍलर्जी, सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात.

केसात खाज होण्याची कारणे :

• केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे,
• केसात इन्फेक्शन झाल्याने,
• केसात उवा झाल्याने,
• हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या ऍलर्जीमुळे,
• केसांची स्वच्छता व निगा न ठेवल्याने,
• डोक्याच्या त्वचेला सूज आल्यामुळे (seborrheic dermatitis),
• वातावरणातील बदलामुळे जसे पावसाळ्यात भिजल्याने किंवा उन्हाळ्यात केसातील घामामुळे,
• हार्मोन्समधील बदलांमुळे,
• मानसिक तणावामुळे,
• तसेच सोरायसिस, शीतपित्त, ऍलर्जी, eczema, डायबेटीस ह्या आजारांमुळेही केसात खाज सुटू शकते.

केसातील खाज कमी करण्याचे हे आहेत उपाय :

सिताफळाच्या बिया –
केसात उवा झाल्यामुळे खाज होण्याची समस्या असल्यास सिताफळाच्या बियांच्या चूर्णाची पेस्ट करून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावावी व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत.

खोबरेल तेल –
डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसात खाज येत असल्यास त्यावर खोबरेल तेल उपयुक्त ठरते. यासाठी केसांना खोबरेल तेलाने मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

कोरपडीचा गर –
अंघोळ करण्यापूर्वी 15 मिनिटे आधी केसांच्या मुळांना एलोवेरा जेल किंवा कोरपडीचा गर लावावा व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लिंबू रस –
पाच चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबूरस मिसळावे. हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी केसांच्या मुळांना चांगल्या पद्धतीने लावावे. अर्ध्या तासानंतर आंघोळ करताना केस हर्बल शॅम्पूने धुवावेत. यामुळे केसातील कोंडा दूर होऊन केसातील खाज कमी होते.

केसात जास्त खाज येत असल्यास Salicylic acid किंवा Ketoconazole हे औषध घटक असणारे शॅम्पूचा वापर करू शकता.

हे सुद्धा वाचा..
केसातील कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..