केस गळती होण्याची कारणे व उपाय याची माहिती जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

केस गळतीची माहिती :

केस गळतीची समस्या आता सर्वचं वयोगटातील लोकांमध्ये कधीनाकधी होत असते. आपली बदललेली जीवनशैली आणि चुकीचा आहार ही यामागील सर्वात मोठी कारणे असतात. एकीकडे चुकीचे खाणे, दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरचं केसांवरही होत आहे. येथे आम्ही केस गळती होण्याची कारणे आणि उपाय यांची माहिती दिली आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

केस गळती होण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये जेनेटिक फॅक्टर, आनुवांशिकता, हार्मोन्समधील बदल, थायरॉईड प्रॉब्लेम, पोषकत्वाची कमतरता, प्रदूषण आणि केसात कोंडा होणे यासारख्या अनेक कारणामुळे केस गळती होत असते.

केस गळती होण्याची कारणे व उपाय :

• हार्मोन्सच्या असंतुलनामुळे स्त्री आणि पुरुषांत केस गळत असतात.
• हार्मोन्सच्या बदलामुळे महिलांमध्ये प्रसूती आणि मॅनेपोजनंतर केस गळती होऊ शकते.
• थायरॉईडची समस्या, मानसिक ताणतणाव यांमुळेही केस गळती होते.
• झिंक, आयर्न, तांबे, selenium, व्हिटॅमिन-D, व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-B12 यासारख्या पोषकतत्वांच्या कमतरतेमुळेही केस गळत असतात.
• याशिवाय कँसरवरील किमो औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, थायरॉईडची औषधे, antidepressants, anticoagulants यासारख्या औषधांच्या परिणामामुळेही केस गळतीची समस्या होऊ शकते.

केस गळती रोखण्यासाठी उपाय :

• कांद्याचा रस केसांच्या मुळाशी आठवड्यातून दोनदा लावल्यास केस गळतीची समस्या दूर होते.
• भिजलेल्या मेथी बीया बारीक करून त्याची पेस्ट केसांना लावून एक तासानंतर केस धुवावेत.
• जास्वंदाची फुले बारीक करून खोबऱ्याच्या तेलात घालून हे तेल काही तासांसाठी केसांना लावावे त्यानंतर केस धुवावेत.
• भृंगराज किंवा ऑलिव्ह तेल केसांच्या मुळाशी लावून मालिश करावी.
• कापूर मिसळलेले खोबरेल तेल केसांना लावावे.

वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..