केस गळण्याची समस्या स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही होत असते. केस गळतीमुळे हळूहळू टक्कल पडण्याची भीती अनेकजणांना वाटू लागते. यासाठी केस गळणे कारणे व उपाय याविषयी माहिती खाली दिली आहे.

केस गळणे कारणे व उपाय :

केस गळण्याची कारणे अनेक असतात. अनुवंशिकता आणि प्रदूषण हे केस गळण्यामागील प्रमुख कारणे असतात. याव्यतिरिक्त खालील कारणेही केस गाळण्यास जबाबदार असतात.

हेअरस्टाईल किंवा केसांची चुकीची देखभाल..
बर्‍याच वेळा चुकीच्या हेअरस्टाईलमुळे केस गळू लागतात. रबर बँडने केस घट्ट बांधणे, वरून पोनीटेल बनविणे यांमुळेदेखील केस खराब होऊन गळू लागतात. याशिवाय डाई, ब्लीच, स्ट्रेटनर्स आणि केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टच्या अतिवापरानेही केस गळणे सुरू होते.

हार्मोन्समधील असंतुलन..
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे स्त्री आणि पुरुषांत केस गळत असतात. हार्मोन्सच्या बदलामुळे महिलांमध्ये प्रसूती आणि मॅनेपोजनंतर केस गळती होऊ शकते. गर्भ निरोधक गोळ्यांचा वापर यामुळे देखील हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे केस गळणे सुरू होऊ शकते.

काही आजारांमुळे..
काही विशिष्ट आजारांमुळे जसे, थायरॉईड डिसऑर्डर, मानसिक ताणतणाव, सिफिलीस, ऍनिमिया किंवा इन्फेक्शनमुळेही केस गळण्याची समस्या होऊ शकते.

विशिष्ट औषधांच्या वापरामुळे..
कर्करोगामधील केमोथेरपी औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, थायरॉईडची औषधे, antidepressants, anticoagulants यासारख्या औषधांच्या वापरामुळेही केस गळण्याची समस्या होऊ शकते.

पोषकतत्वांची कमतरता..
शरीरातील झिंक, आयर्न, तांबे, selenium, व्हिटॅमिन-D, व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-B12 यासारख्या पोषकतत्वांच्या कमतरतेमुळेही केस गळण्याची समस्या होत असते.

केस गळणे रोखण्यासाठी उपाय :

• आठवड्यातून दोनदा कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळणे कमी होते.
• जास्वंदाची काही फुले बारीक करून खोबऱ्याच्या तेलात घालून हे तेल काही तासांसाठी केसांना लावावे व अर्ध्या तासाने केस धुवावेत.
• भृंगराज तेल किंवा ऑलिव्ह तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.
• कोरपड जेल केसांच्या मुळाशी लावून मालिश करावी. या घरगुती उपायांमुळे केस गळणे कमी होते.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...