बाळाची वाढ आणि विकास मराठीत माहिती (Baby Development)

7834
views

Growth and development of Baby in Marathi information, Baby weight chart in Marathi

बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे :

बाळाचे वय बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे
पहिला महिना मान सावरणे, आईला ओळखणे, वजनात 0.5 ते 1 किलो वाढ
दुसरा महिना बाळाची नजर स्थिर, बाळ हसते, माणसे ओळखून हसणे
तिसरा महिना हालचालीत वाढ, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद
चौथा महिना हातात वस्तू पकडणे, मांडीवर टेकून बसणे,.मानेचा तोल सावरता येणे
पाचवा महिना ओरडणे, वस्तूचा शोध घेणे, जन्म वजनाच्या दुप्पट वजन
सहावा महिना आधार दिल्यास खुर्चीत बसू शकते
सातवा महिना रांगणे, हाताने पदार्थ खाणे,नाव घेतल्यास प्रतीसाद
आठवा महिना आधाराशिवाय बसणे, काका, बाबा, दादा इ. शब्द बोलणे
नववा महिना बाळ स्वतःच्या शरीराला हाताने आधार दिल्याशिवाय स्वतंत्रपणे बसू शकते. हातांवर आणि गुडघ्यांवर रांगू शकते, आधाराने उभे राहणे, वस्तूची आवड दाखवणे
दहावा महिना बसल्यावर उठून उभे राहणे, टाळ्या वाजवणे, टाटा करणे
अकरावा महिना हात धरून पावले टाकणे, वस्तू पकडणे, खेळात रस घेणे
बारावा महिना स्वतःहून उभे रहाते. “आई” म्हणायला व त्यासारखे शब्द बोलायला शिकते, .एखाद्या वस्तूचा आधार घेऊन चालते. जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन
18 महिने स्वतःच्या हाताने पेला धरून न सांडवता पाणी पिते. खोलीत न पडता, न धडपडता बरेच अंतर चालते, थोडे शब्द बोलते. स्वतःच्या हाताने खाते
2 वर्षे अंगावरील पायजम्यासारखे कपडे काढू शकते. न पडता धावू शकते,. पुस्तकातील चित्रांमध्ये रस घेते, त्याला हवे ते मागू शकते. दुस-याने बोललेले शब्द बोलते. त्याच्या शरीराचे काही अवयव ओळखू शकते.
3 वर्षे बॉल फेकू शकते, साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. उदा: तू मुलगा आहेस की मुलगी? वस्तू आवरून ठेवू शकते. एखाददुस-या रंगाचे नाव सांगू शकते.
4 वर्षे तीनचाकी सायकल चालवू शकते. पुस्तकातील चित्रांची नावे सांगू शकते

.
0 ते 10 वर्ष वयाच्या लहान मुलांच्या वजन व उंचीचा तक्ता :
बाळाचे वजन किती असावे ते खालील बाळाचे वजन तक्ता यामधून जाणून घ्या. मुलांचे वजन किलोग्राममध्ये तर उंची सेंटीमीटरमध्ये दिली आहे.

बाळाच्या आरोग्यासाठी खालील उपयुक्त माहितीही वाचा..
बाळाचा पहिला आहार – आईचे दूध
नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी
बाळाचा वरचा आहार
बाळासाठी आवश्यक लसीकरण तक्ता

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

Baby Weight & Height Chart in Marathi.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.