गर्भारपण :
गर्भारपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. प्रामुख्याने हॉर्मोन्समधील बदलांमुळे असे घडत असते. ‘प्रोजेस्टेरॉन’ हे हार्मोन गर्भारपणात वाढलेले असते, त्यामुळे काही लक्षणे जाणवू लागतात. स्त्रीमध्ये गर्भारपणाची कोणकोणती लक्षणे जाणवू शकतात याविषयी माहिती खाली दिली आहे.
गर्भारपणाची ही आहेत लक्षणे :
• मासिक पाळी चुकते,
• मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उठल्याबरोबर खूप मळमळ होते,
• चक्कर येते, उलटी आल्यासारखं होते,
• उलट्या होऊ लागतात.
• खूप थकल्यासारखं होते,
• पोट फुगल्यासारखं किंवा गच्च वाटते,
• सारखे-सारखे लघवीला होते,
• अंग गरम झाल्यासारखे वाटते,
• चिडचिडेपणा वाढतो, मूड सतत बदलत असतो,
• काही विशिष्ट प्रकारचे अन्न खावेसे वाटते; यालाच आपण ‘डोहाळे लागले’ असे म्हणतो.
• काहीवेळा स्तन दुखू लागतात, स्तन सुजल्यासारखे वाटतात.
वरील काही लक्षणे जाणवत असल्यास गर्भधारणा चाचणीद्वारे गर्भारपण आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. घरच्याघरी गर्भधारणा चाचणी कशी करावी याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..