Emergency Treatment of the Paralytic Attack in Marathi, First Aid for Stroke in Marathi.
लकवा किंवा पक्षाघाताचा झटका (Paralysis) आल्यावर लगेच करा हे उपाय :
मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास ब्रेन अॅटॅक किंवा पॅरालिसिसचा झटका येतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. ब्रेन अॅटॅकला पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा लकवा मारणे असेही म्हणतात. पॅरालिसिसविषयी मराठीत संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
लक्षात ठेवा FAST –
पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी FAST लक्षात ठेवा.
F – Face (Facial Weakness) : रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.
A – Arms (Arm Weakness) : रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.
S – Speech (Speech Difficulty) : रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.
T – Time (Time to Act) : वरील लक्षणे रुग्णामध्ये दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. यासाठी तात्काळ 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.