ECG किंवा EKG test – Electrocardiogram :

आपल्या हृद्याच्या कार्याची स्थिती तपासण्यासाठी तसेच अनेक हृद्यासंबंधी विकारांचे ज्ञान ECG परिक्षणामुळे होण्यास मदत होते. या परिक्षणामुळे हृद्याच्या विद्युत आवेगाची स्थिती ओळखण्यास मदत होते. हृद्याच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर विद्युत आवेग (Electrical impulse) हृद्यातून जात असतो. या आवेगामुळे हृद्याच्या मांसपेशी संकुचित होतात आणि त्यामुळे हृद्यातून रक्त प्रवाहित केले जाते.

ECG मध्ये P wave, QRS Complex, ST segment आणि T wave अशा चार वेगवेगळ्या विद्युत लहरी ECG आलेखात असतात. त्यापैकी ST आणि T waves यांच्या बदलांवरून हृदयविकाराचे निदान केले जाते.

ECG टेस्टमुळे आपल्या डॉक्टरांना खालील स्थितींचे ज्ञान होण्यास मदत होते..
• हृदयाच्या विद्युत आवेगाची स्थिती ओळखण्यास मदत होते. जसे विद्युत आवेग सामान्य आहे की अनियमित, मंद, अधिक जलद आहे याचे ज्ञान होते.
• हृद्यच्या कर्याचे स्वरुपाचे ज्ञान होते. हृद्याला अधिक कार्य करावे लागते का, याचे अवलोखन होते. किंवा हृद्य मांसपेशीँची स्थिती कळण्यास मदत होते.
• ECG टेस्टमुळे रुग्णाला हृदयविकार आहे का, हृदयविकाराचा झटका आला आहे का, मागे कधी हार्ट अटॅक आला होता का, हार्ट अटॅक आलेला असल्यास त्याची तीव्रता किती, हार्ट अटॅक आल्यामुळे हृदयाच्या कोणत्या भागाला इजा झाली आहे, हृदयाची गती, अनियमित ठोके आहेत का? या सर्वाचे ज्ञान ECG मुळे होण्यास मदत होते.
• हृद्यासंबंधी धोक्याची संभाव्यता कळण्यास मदत होते. यामुळे हृद्यविकाराचा झटका येणे, पक्षाघात किंवा तत्सम हृद्याच्या विकारांवर वेळीच प्रतिबंध करण्यास मदत होते.

ECG टेस्टसाठी किती वेळ लागतो :
केवळ 15 ते 30 मिनिटात परिक्षण पूर्ण होते.
ECG परिक्षणामध्ये छाती, हात आणि पायांवर 12 Pads चिकटवतात. ते Pads वायर्सद्वारे ECG मशीनशी जोडलेले असतात. त्यानंतर मशिन आपल्या हृद्याच्या कार्याची नोंद करत असते. ECG Test करीत असताना कोणताही त्रास होत नाही. परिक्षण झाल्यानंतर शरिरावर चिकटवलेले Pads व वायर्स काढले जातात.

ECG टेस्टसाठी खर्च किती येतो..?
ECG test करण्यासाठी 400 ते 1000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅक मराठीत संपूर्ण माहिती
हार्ट अटॅकपासून दूर राहण्याचे उपाय
पक्षाघात, लकवा
हाय ब्लडप्रेशर

Electrocardiogram (ECG) Uses, Side Effects, Procedure, Results in Marathi.