Dr Satish Upalkar’s article about Ear itcing causes, home remedy & treatment in Marathi.
कानात खाज येणे – itchy ears :
बऱ्याचदा आपल्या कानात खाज येत असते. कानाला खाज सुटणे याची कारणे अनेक असू शकतात. कानात खाज येण्याबरोबरच कानात सूज व वेदना होणे, ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होणे हे त्राससुध्दा यामध्ये जाणवू शकतात. येथे कानात खाज येण्याची कारणे व त्यावरील उपाय यांची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी दिली आहे.
कानाला खाज येण्याची कारणे – Itchy ears causes in Marathi :
कानाची त्वचा कोरडी झाल्यामुळे कानात प्रामुख्याने खाज येत असते. कानात योग्य प्रमाणात Wax तयार होत नसल्यास कानाची त्वचा कोरडी पडत असते. याशिवाय कानामध्ये खालील कारणांनी खाज सुटत असते.
- कानाच्या त्वचेतील एलर्जीमुळे,
- साबण, शाम्पू किंवा अन्य कॉस्मेटिक प्रोडक्टच्या एलर्जीमुळे,
- कानात इन्फेक्शन झाल्यामुळे,
- कानाच्या आत जखम झाल्याने,
- कानाच्या मशीनच्या वापरामुळे,
- एखादा किडा कानाच्या ठिकाणी चावल्याने,
- कानाची स्वच्छ्ता न ठेवल्याने कानाला खाज येते.
- याशिवाय सोरायसिस, एक्जिमा सारख्या त्वचा विकारामुळेही कानामध्ये खाज येऊ शकते. [1]
कानात खाज येणे यावरील उपाय :
कोरपडीच्या गराचा रस –
कानामध्ये खाज येत असल्यास कोरपडीच्या गराचे 3 ते 4 थेंब कानात घालावेत. यामुळे कानातील त्वचेचा कोरडेपणा निघून जातो. तसेच कोरपडीच्या गरात सूज कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्मही असतात. यामुळे कानात होणारी सूज व वेदनासुध्दा कमी होते.
तेल –
कानात खाज येत असल्यास कानात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल घालावे. तेलातील स्निग्ध गुणांमुळे त्वचेतील कोरडेपणा निघून जातो व कानाला खाज येणे कमी होते.
लसूण –
लसूणमध्ये अँटीबायोटिक व सूज कमी करणारे गुणधर्म असतात. लसूण पाकळी थोड्या तेलात घालून ते तेल गरम करून घ्यावे. कोमट झाल्यावर ह्या तेलाने कानाभोवती मालिश करावी. या घरगुती उपयामुळेही कानात खाज येणे थांबते.
कानामध्ये खाज येणे यावर औषध उपचार – Ear itching treatment in Marathi :
कानात खाज नेमकी कोणत्या कारणामुळे येत आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात. जर इन्फेक्शनमुळे कानात खाज येत असल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आपले डॉक्टर काही अँटीबायोटिक्स, अँटीफंगल ear drops लिहून देऊ शकतात. [2]
कानात खाज सुटणे यावर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. कारण इन्फेक्शनमुळे कानात खाज येत असल्यास यामुळे कानाच्या आतही संसर्ग पसरून कानात सूज आणि वेदना होतात. तसेच ऐकण्याच्या शक्तीवरही परिणाम होऊ शकतो.
कान खाजवणे टाळा ..
कानात खाज येत असल्यास कानात बोटे किंवा इतर टोकदार वस्तू घालून कान खाजवणे टाळावे. कारण यामुळे कानाला नखे किंवा इतर टोकदार वस्तू लागून कानात जखम होण्याची व तेथे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा ..
कान दुखणे यावरील उपचार जाणून घ्या..
Information about Itchy ears causes & treatment in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.