पाण्यात बुडणे

2943
views

पाण्यात बुडणे :

  • जर एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्वरित त्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढा. पाण्यात पडलेल्या व्यक्तीला जेव्हा पाण्यातून बाहेर काढले जाते तेव्हा तेव्हा जर त्याचा श्वास अडकला असेल किंवा श्वास घ्यायला त्रास पडत असेल तर प्रथम त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो.
  • त्या व्यक्तीच्या तोंडात किंवा चेहर्‍यावर चिखल किंवा फेस असेल तर चेहरा व तोंड जवळ उपलब्ध असलेल्या कापडाने पुसून काढा.
  • ह्या व्यक्तीची श्वासनलिका मोकळी करा आणि हृदय तसेच श्वास चालू असल्याची खात्री करा
  • ती बेशुद्ध असल्यास तिला खाली झोपवा, त्याचे पोट दाबा. त्यानंतर त्या व्यक्तीला उलटे वळवा व पोटाच्या मागच्या भागावर दाब द्या, म्हणजे पाणी शरीराबाहेर फेकले जाईल.
  • श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वास द्या.
  • इतर काही दुस-या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वमान्य प्रकार आहे.
    डॉक्टरांना बोलवा

अपघातग्रस्त व्यक्ती बेशुद्ध असेल अन् श्वास घेत असेल तर त्या व्यक्तीला पाठीवर झोपवा व तिचे डोके थोडेसे एका बाजूला वळवा. त्या व्यक्तीच्या नाकपुड्या बंद करून त्याच्या तोंडात जोराने फुंकरीने हवा सोडा. खूप जोरात फुंकर मारा म्हणजे त्या व्यक्तीची छाती वर-खाली हलू लागेल. तीनपर्यंत आकडे मोजा आणि पुन्हा फुंकर मारा. ती व्यक्ती नीट श्वास घेऊ लागेपर्यंत हे चालू ठेवा अशा प्रथमोपचारानंतर त्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात न्या.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.