मधुमेहात कोणकोणती लक्षणे जाणवतात

1931
views

मधुमेह लक्षणे :
कधीकधी टाईप 2 मधुमेहाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. मात्र बहुतांश रुग्णामध्ये टाईप 2 डायबिटीज छुप्या स्वरुपात असतो. टाईप 2 डायबिटीजला मधुमेहपुर्व अवस्था असे म्हणतात. मधुमेहपुर्व अवस्थेमध्ये जर रुग्णाने योग्य आहार, विहार, औषधोपचारांचा अवलंब केल्यास मधुमेहापासून दूर राहता येते. मात्र टाईप 2 मधुमेह असूनही अयोग्य आहार, विहाराचे अवलंब केल्यास कायमस्वरुपी मधुमेही रुग्ण होण्याचा धोका अधिक असतो.
यासाठी प्रत्येकाने नियमित रक्तातील साखरेची तपासणी करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मधुमेहात कोणकोणती लक्षणे जाणवतात..?
◦ रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असणे,
◦ मुत्रपथ संसर्गीत होणे,
◦ अशक्तपणा, चक्कर येणे,
◦ वारंवार लघवीला होणे,
◦ मुत्राचे प्रमाण अधिक असणे,
◦ मळमळणे,
◦ उलटी होणे,
◦ त्वचा विकार उद्भवणे,
◦ वजन कमी होणे,
◦ थकवा जाणवणे,
◦ डोळ्यांचे विकार उद्भवणे,
◦ अधिक भूक लागणे,
◦ वारंवार तहान लागणे ही लक्षणे टाईप 2 मधुमेहामध्ये आढळतात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.