प्रसूती कशी होते – बाळंतपण माहिती मराठीत (Delivery in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Labour pain and delivery information in Marathi

बाळंतपण (प्रसूती) मराठीत माहिती :

बाळंतपण ही एक नैसर्गिक क्रिया आहे. गरोदर स्त्री ज्यावेळी आपल्या बाळाला जन्म देते त्या अवस्थेला बाळंतपण किंवा प्रसुती किंवा Delivery होणे असे म्हणतात. साधारण 40 आठवडे किंवा 9 महिने संपल्यावर ‘प्रसुतिच्या कळा’ यायला सुरवात होते. प्रत्येक मातेचा कळा येण्याचा काळ व वेळ वेगवेगळे असू शकते. सर्वच अर्भकांचा जन्म बरोबर तेवढाच कालखंडाने होत नाही. काही अर्भके खूप आधी जन्मतात, तर काही हा उलटून गेल्यावर जन्मतात.

बाळंतपणानंतर बाळ आणि आई दोघेही सुखरुप असणे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणे होय. मग ते बाळंतपण नैसर्गिक असो वा टाक्याचं किंवा शस्त्रक्रियेचं, सिझेरियन असलं तरीसुद्धा बाळ आणि आई दोघेही सुखरुप असणे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणे होय.

Premature Birth –
गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्यापूर्वी काही दिवस आगोदर जन्म झाल्यास अकस्मात जन्म (Premature Birth) होतो. ही मुले अशक्त, कमी वजन असलेली व अपूरी वाढ झालेली देखील असू शकतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

डिलिव्हरीची तारीख कशी ठरवली जाते..?
गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. शेवटच्या मासिक पाळीच्या दिवसापासून पुढे अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ महिने आणि सात दिवस झाल्यावर येणारी तारीख ही डिलिव्हरीची अंदाजीत तारीख असेल.
उदा. शेवटच्या पाळीचा पहिला दिवस एक मार्च असल्यास आठ डिसेंबरला डिलिव्हरीची अंदाजीत तारीख येईल.

बाळंतपण रूग्णालयात होणे गरजेचे का आहे..?
बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरीही अनेकदा बाळंतपणात आई व जन्मणारे बाळ यांना त्रास होऊ शकतो, गंभीर स्थितीही उद्भवू शकते. प्रसुतीवेळी खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. तसेच इतरही काही गंभीर धोके उद्भवू शकतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. प्रसुतीवेळी सतत वैद्यकीय देखरेख आवश्यक असते. म्हणूनच आई व बाळासाठी बाळंतपण हे रूग्णालयामध्येचं होणे गरजेचे आहे.

बाळंतपणाच्या आसपास आहार कसा असावा..?
बाळंतपणाच्या वेळी दवाखान्यात जाताना आहाराबद्दल काळजी घ्यावी. पोटभर मुळीच जेवू नये. अगदी थोडा, हलका-फुलका आहार घ्यावा. तेलकट, तुपकट काही खाऊ नये. कळा येण्याच्या वेळी उलटी होण्याची शक्यता असू शकते. भूल देण्याचा प्रसंग आला तर जेवण घेतलेले असल्यास त्रास होतो, हेही लक्षात असू दयावे.

बाळंतपणात कळा का येतात..?
बाळ आईचं गर्भाशय सोडायला लागले की, आईचे शरीर बाळाला बाहेर ढकलू लागते. या नैसर्गिक प्रक्रियेतूनच कळा निर्माण होतात. या कळा पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून येतात. कळा येत गेल्या की, गर्भाशयाचा वरचा भाग कठीण होत जातो व गर्भाशयाचे तोंड उघडले जाते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

प्रसूतीच्या कळा कशा ओळखायच्या..?
प्रसव कळा या बाळंतपणाच्या अगोदर 10 ते 12 तास सुरु होतात. त्या सुरुवातीला 10 ते 15 मिनिटाच्या अंतरा-अंतराने व पुढे पुढे लवकर लवकर येऊ लागतात. त्या पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून आतून येतात. पोटदुखीच्या वेळी जे पोट दुखते ते वेगळे असते. त्याच्या कळा अंतराअंतराने येत नाही. तसेच त्या वेदना पोटाच्या बाजूला असतात. हा फरक नीट लक्षात घ्यावा.

प्रसूतीसंबंधी खालील माहितीही वाचा..
नॉर्मल डिलिव्हरी किंवा नैसर्गिक प्रसूती कशी होते ते जाणून घ्या.
नॉर्मल डिलिव्हरी होत नसल्यास डॉक्टर सिझेरियन वैगेरे पध्दतीने प्रसूती कशी करतात.
प्रसूतीनंतर घ्यायची काळजी.
नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी.

how to start labour pain at home in Marathi, delivery symptoms in 9th month in Marathi.