Dr Satish Upalkar’s article about Dark Underarms tips in Marathi.
काखेतील काळे डाग –
काखेत काळे डाग पडल्याची तक्रार अनेकांना असते. प्रामुख्याने काखेची स्वच्छता न ठेवणे, मेलॅनीन तसेच डिओडोरेंट चा अतिवापर अशा अनेक कारणांमुळे काखेत काळे डाग पडतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी काखेतील काळे डाग घालवण्यासाठी उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.
काखेत काळे डाग का व कशामुळे पडतात ..?
आपल्या त्वचेचा रंग हा मेलानोसाइट्स नावाच्या रंगद्रव्य पेशींद्वारे ठरतो. जेव्हा या पेशी त्वचेच्या एखाद्या ठिकाणी अधिक असतात तेंव्हा तेथील त्वचा ही गडद काळी होत असते. तीच गोष्ट काखेच्या बाबतीतही घडू शकते. जर काखेतील त्वचेत मेलॅनीनचे प्रमाण अधिक असल्यास काख अधिक काळवंडते. याशिवाय खालील कारणांनी काखेत काळे डाग पडतात.
- काखेची स्वच्छता न ठेवल्यास काखेत काळे डाग पडतात.
- काखेतील घाम,
- हार्मोन्समधील असंतुलन,
- अनुवांशिकता,
- काखेभोवती घट्ट कपड्यांचा वापर,
- केमिकलयुक्त डिओडोरेंट व antiperspirants चा अतिवापर,
- बर्थ कंट्रोल गोळ्या, नियासिन, कॉर्टिकोस्टिरॉईड्स अशा औषधांच्या वापरामुळे,
- सिगारेट स्मोकींग सारखी व्यसने,
- तसेच लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह, हायपोथायरॉईडीझम, PCOD, कुशिंग सिंड्रोम अशा आरोग्य समस्या असल्यास त्यामुळेही काखेत काळे डाग पडतात.
काखेत काळे डाग पडणे यावर उपाय –
1) काखेतील काळे डाग घालवण्यासाठी तेथे हळदीची पेस्ट लावा.
चमचाभर हळदीत एक चमचा मध व दूध मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट काखेतील काळ्या डागांवर लावावी. आणि 15 मिनिटांनी आंघोळ करून काख स्वच्छ करावी. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा घरगुती उपाय केल्यास काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.
2) काखेतील काळे डाग जाण्यासाठी तेथे कापलेला बटाटा चोळा.
कच्च्या बटाट्यात नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे काखेतील डाग घालवण्यास मदत होते. यासाठी बटाट्याचे तुकडे काखेत काळे डाग असलेल्या भागावर चोळावे यामुळे काखेतील काळे डाग निघून जातात.
3) काखेतील काळे डाग कमी करण्यासाठी तेथे लिंबाचा रस लावा.
लिंबाच्या रसात मुबलक प्रमाणात विटॅमिन-C असते. व्हिटॅमिन-सी हे मेलॅनीनचे प्रमाण कमी करून त्वचेवरील काळे डाग घालवते. यासाठी लिंबाच्या रसात थोडे मध मिसळा व हे मिश्रण काखेतील काळ्या डागांवर लावावे. त्यानंतर अर्ध्या तासाने आंघोळ करून काख स्वच्छ करावी. काखेतील काळे डाग जाण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
4) काखेतील काळे डाग घालवण्यासाठी तेथे एलोवेरा जेल लावा.
कोरफडीच्या ताज्या पानांचा गर काखेतील काळ्या डागांवर चोळावा. अर्ध्या तासाने आंघोळ करून काख स्वच्छ करावी. या उपायाने काखेतील काळपटपणा दूर होतो. यासाठी आपण एलोवेरा जेलसुध्दा वापरू शकता.
5) काखेत काळे डाग असल्यास तेथे लिंबू रसात हळद मिसळून लावा.
हळद ही त्वचेच्या पिगमेंटेशनला कमी करून काखेतील काळे डाग कमी करते. यासाठी हळद ही लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काळ्या डागावर लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने आंघोळ करून काख स्वच्छ करावी. यामुळे काखेत असणारे काळे डाग कमी होण्यासाठी मदत होते. काखेतील काळे डाग घालवण्यासाठी हळदीचा हा आयुर्वेदिक उपाय खूप गुणकारी असा आहे.
काखेतील काळे डाग घालवण्यासाठी क्रीम्स – Dark Underarms Creams in Marathi :
काखेतील काळे डाग घालवण्यासाठी बऱ्याच चांगल्या क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत. या क्रीममध्ये व्हिटॅमिन-E सारखे उपयुक्त घटक असतात. काखेत असणारे काळे डाग जाण्यासाठी खालील क्रीम्स तुम्ही वापरू शकता.
- Qraa Advanced Lacto Dark Underarm Whitening Cream,
- Nivea Deodorant Roll-on,
- Bare body essentials Underarm cream,
- Namyaa Intimate Lightening Serum
काखेतील काळे डाग जाण्यासाठी लेझर थेरपी (Laser therapy) –
काखेतील काळे डाग घालवण्यासाठी लेझर थेरपी खूप उपयोगी पडते. यामुळे काखेतील काळे डाग निघून जातात तसेच शेव्हिंग आणि वॅक्सिंगची आवश्यकताही लेझर थेरपीमुळे भासत नाही.
हे सुध्दा वाचा – चेहरा सुदंर होण्यासाठी उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesIn this article information about causes of
dark underarms and their home remedies solution in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.