दाढ दुखीवर घरगुती उपाय मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Dadh dukhi var gharguti upay in Marathi, dadh dukhi var upay in Marathi, Toothaches treatment in Marathi.

दाढ दुखणे :

दाढ दुखी अनेक कारणांनी होऊ शकते. विशेषतः दातांची योग्य काळजी न घेतल्यामुळे, दाढ किडल्यामुळे, दाढेत अन्नाचे कण अडकल्याने, दाढेची मुळे सैल झाल्यामुळे, हिरड्या सुजल्यामुळे दाढ दुखी होत असते. यामुळे दाढेच्या ठिकाणी भयंकर वेदना होत असतात. यासाठी दाढदुखी वर घरगुती उपाय यांची माहिती खाली दिली आहे.

दाढ दुखी वर घरगुती उपाय :

लवंग –
दाढदुखी होत असल्यास लवंग खूप उपयोगी ठरते. लवंगमधील anesthetic आणि analgesic या गुणामुळे दाढेतील वेदना व सूज कमी होते. यासाठी दुखणाऱ्या दाढेजवळ लवंग तेल कापसाच्या बोळ्याने लावल्यास दाढदुखी दूर होते. तसेच त्याठिकाणी दाढेत लवंग धरून ठेवणेही उपयोगी ठरते.

तुळशीची पाने –
तुळशीची पाच ते सहा पाने स्वच्छ धुवून बारीक वाटून त्यांचा रस काढावा. या रसात 3 ते 4 कापराच्या वड्या मिसळाव्यात. कापसाचे बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत. यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.

पेरूची पाने –
पेरूच्या पानात anti-inflammatory आणि antimicrobial हे गुण असतात. त्यामुळे हिरड्यांना आलेली सूज व इन्फेक्शन कमी होऊन वेदना दूर होते. यासाठी पेरूची पाने स्वच्छ धुवून तोंडात चघळत राहावीत.

हिंग –
हिंगसुद्धा दाढदुखीवर ते गुणकारी ठरते. यासाठी चिमुटभर हिंग दुखणाऱ्या दाढेजवळ लावावे यामुळे दाढ दुखणे कमी होण्यास मदत होईल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

डेंटिस्टचा सल्ला घ्या..

घरगुती उपायांनी दाढ दुखी कमी न आल्यास आपल्या दंतरोगतज्ञ डॉक्टरांकडून (डेंटिस्टकडून) दाढांची तपासणी व उपचार करून घ्यावेत.

दाढ दुखीवर गोळी :

दाढ दुखी सामान्य असल्यास Paracetamol आणि Ibuprofen हे घटक असणारी वेदनाशामक गोळी घेऊ शकतात. यामुळे दाढ दुखी थांबण्यास मदत होईल. वेदनाशामक गोळीमुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो यासाठी वरील वेदनाशामक गोळीबरोबर Antacids ची गोळीही घ्यावी.

Toothaches Causes, Treatment, Remedies in Marathi.