कोरोना विषाणू – Coronavirus :

कोरोना व्हायरस हा एक नवीन विषाणू असून तो सार्सच्या विषाणूपेक्षाही जास्त घातक आहे. डब्ल्यूएचओच्या मते ताप, खोकला, श्वास लागणे ही कोरोना व्हायरसची लक्षणे आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहानमध्ये या विषाणूची लागण सुरू झाली होती. चीननंतर जगभरातही कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2020 मध्ये कोरोना विषाणूस आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणून जाहीर केली होती. तसेच या साथीला COVID-19 असे नाव देण्यात आले होते.

कोरोना व्हायरसची लक्षणे (COVID-19 Symptoms) :

कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास सर्दी, ताप, खोकला, श्वास लागणे, शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, घशात सूज येणे, अस्वस्थता, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येणे, अतिसार, उलट्या यासारखी कोरोनाची लक्षणे असू शकतात.

कोरोना विषाणूची कारणे (Causes) :

कोरोना व्हायरस हा एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमित होत असतो. तसेच कोरोना व्हायरस मानव आणि प्राणी अशा दोघांमध्येही पसरू शकतो. अशाप्रकारे कोरणाची लागण व प्रसार होत असतो.

कोरोनाचा जास्त धोका कोणाला..?

लहान मुलांमध्ये व वयोवृद्ध व्यक्तींमध्ये याचा संसर्ग लवकर होत असतो. तसेच हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, किडनीचे विकार, प्रेग्नंट महिला, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता आधिक असते.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना (Prevention) :

आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.
• दिवसातून अनेकदा हात स्वच्छ धुवावेत.
• हात धुण्यासाठी गरम पाणी व साबण किंवा हॅन्ड सेनेटायझरचा वापर करावा.
• गरज वाटल्यास तोंडाला मास्क वापरावा.
• खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमालाचा वापर करावा.
• सर्दी आणि फ्लूची लक्षणे असलेल्या लोकांजवळ जाणे टाळा.
• गर्दीच्याठिकाणी जाणे टाळा.
• गरज नसल्यास प्रवास करणे टाळा.
• सर्दी, खोकला, ताप यासारखा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार घ्यावेत.
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल स्टोअरमधून स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे टाळावे.
• लहान मुलांना ताप आला असल्यास एस्परिन असणारी औषधे देणे टाळावे.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
• कच्चे मांस किंवा अर्धवट शिजलेले मांस व कच्ची अंडी खाणे टाळा.
• जंगली प्राण्यांशी संपर्क टाळा.
• कोरोना संबंधीच्या अफवांपासून सावध राहा.
• कोरोनावरील लस टोचून घ्यावी.

कोरोनावरील उपचार (COVID-19 Treatment option) :

कोरोना संसर्गित रुग्णांवर लक्षणांनुसार उपचार केले जातात. कोरोना वायरसपासून पीड़ित असणाऱ्या लोकांवर remdesivir, bamlanivimab यासारख्या औषधांच्या माध्यमातून उपचार केले जातात. तसेच antiviral आणि retroviral औषधे, blood plasma transfusions यांचाही उपचारामध्ये समावेश केला जातो.

कोरोना लसीकरण – COVID-19 vaccine :

कोव्हिड-19 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहीम भारतात सुरू झाली आहे. याच्या लसी सरकारी व काही खाजगी दवाखान्यात उपलब्ध आहेत. सरकारी दवाखाने, आरोग्य केंद्र यामध्ये कोव्हिड-19 विरोधी लस ही मोफत आहे.

वृध्दव्यक्ती किंवा हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार यासारख्या पीडित रुग्णांनी कोणतीही शंका न बाळगता कोरोनाविरोधी लस घ्यावी. कोरोना लशीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते तसेच कोरोनावर ह्या लसी परिणामकारक आहेत. कोरोना लशीबद्दलचे कोणतेही समज-गैरसमज करून घेऊ नयेत. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता ह्या लसी घ्याव्यात.

Read Marathi language article about Coronavirus (COVID-19) symptoms, causes, prevention and treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.