कॉलरा रोगाची मराठीत माहिती (Cholera in Marathi)

Cholera in marathi Cholera Causes, Symptoms & Diagnosis Treatment in marathi

कॉलरा रोगाची माहिती :
Cholera information in marathi
कॉलरा किंवा पटकी आजार हा लहान आतड्याना होणारा एक तीव्र संसर्गजन्य (साथीचा) रोग आहे. कॉलरा रोगाच्या लक्षणामध्ये तीव्र पाण्यासारखे जुलाब आणि उलट्यांचा समावेश होतो. उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता होऊन डिहायड्रेशन होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वरित उपचार न झाल्यास गंभीर स्थिती उदभवू शकते.

कॉलरा लक्षणे :
Cholera symptoms in marathi
• पोटात वेदना होणे.
• ‎वारंवार पातळ शौचास (जुलाब) होते.
• ‎मळमळणे व उलट्या होतात.
• ‎लघवीचे प्रमाण कमी होते.
• ‎तोंड, त्वचा कोरडी पडते.
• ‎अशक्तपणा जाणवितो.
ही लक्षणे जाणवितात.

कॉलरा आजाराची कारणे :
Cholera causes in Marathi
व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे (बॅक्टरीयामुळे) हा रोग होतो. ज्या व्यक्तीना कॉलराची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉलर्‍याचा फैलाव होतो. दूषित पाणी, आजूबाजूची अस्वच्छता ह्यांतुन कॉलराचे बॅक्टरीया आजार पसरवत असतात.
‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये पटकीचा धोका अधिक असतो. काहीं कारणाने जठराची आम्लता कमी झाल्यास पटकीच्या संसर्गाचा धोका वाढतो. चार ते पाच वर्षाच्या मुलामध्ये पटकीच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.

पटकीच्या जिवाणूंचा शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर एक ते पाच दिवसामध्ये भाताच्या पेजेसारखे जुलाब होऊ लागतात. उपचार केले नाहीत तर दिवसाकाठी दहा ते वीस लिटर पाणी जुलाब आणि उलट्यांवाटे शरीरातून बाहेर पडते. वेळीच उपचार चालू केले नाहीत तर झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व शरीरात डीहायड्रेशनची गंभीर स्थिती उदभवते आणि प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. डीहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो, नाडी वेगाने चालते, व्यक्तीचे डोळे खोल जातात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात.

पटकी रोग उपाययोजना, कॉलरा प्रतिबंधात्मक उपाय :
Cholera prevention tips in marathi
कॉलराची लागण होऊ नये म्हणून हे करा..
• उकळवून गार केलेले स्वच्छ पाणी प्यावे.
• ‎जेवण योग्य पद्धतीने शिजवून योग्य पद्धतीने साठवून ठेवले पाहिजे.
• ‎भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत.
• ‎एखादा पदार्थ खराब झाल्याची शंका असल्यास ते खाऊ नये.
• ‎आजारी व्यक्तीने जेवण तयार करू नये.
• ‎जेवण्याआधी तसेच बाथरुमला जाऊन आल्यानंतर दोन्ही हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• ‎घरातील व आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता राखावी.

कॉलरा रोग उपचार माहिती मराठीत :
Cholera treatment in marathi, Cholera home remedies, upchar in marathi
कॉलरात जुलाब झाल्याने तसेच उलट्यांमधून शरीरातील पाण्याची होणारी झीज भरून काढणे गरजेचे असते. दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.
• डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी तसेच नारळाचे पाणी, भाताची पेज किंवा इतर द्रवपदार्थ भरपूर द्यावेत. जलसंजीवनी (ओआरएस) द्यावी. शुष्कता कमी असल्यास किंवा जलसंजीवनी पावडर नसल्यास साखर-मीठ-पाण्यापासून घरीच जलसंजीवनी करून रुग्णास देता येते.
• ‎घरीच जलसंजीवनी करण्यासाठी स्वच्छ 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ चांगले एकजीव करावे. ही जलसंजीवनी रुग्णास वरचेवर थोडी थोडी देत राहावी. त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण संतुलित राहते व रुग्ण बरा होतो. एकदा केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी वापरू नये. दुसऱ्या दिवशी याचे पुन्हा नवीन मिश्रण करावे व ते वापरावे.
• ‎रुग्णाला खाण्याकरिता साधे जेवण द्यावे. मसालेदार, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ असलेले जेवण टाळावे.
• ‎आजार तीव्र स्वरूपाचा असेल, भरपूर प्रमाणात पातळ शौचास होत असल्यास, उलटया होत असल्यास किंवा शौचातुन रक्त पडत असल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे असते.

दूषित पाण्यातून पसरणारे खालील साथीच्या रोगांचीही मराठीत माहिती वाचा..
टायफॉईड ताप (Typhoid fever in marathi)
अतिसार, हगवण (Diarrhoea in Marathi)
गॅस्ट्रोची साथ (Gastroenteritis in Marathi)
कावीळ (Jaundice in Marathi)


हे सुद्धा वाचा..

अन्य साथीच्या आजारांविषयी मराठीत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.