Posted inHealth Article

डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे व उपाय

डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे : डोळ्याखाली काळे वर्तुळे येण्याची समस्या बऱ्याच स्त्रीया आणि पुरुषांना असते. डोळ्याखाली आलेल्या काळ्या वर्तुळांचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. डोळ्याभोवती काळे वर्तुळं असल्यास आपण जास्तचं वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे : डोळ्याखाली गडद काळी वर्तुळे होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. शारीरिक थकवा, अशक्तपणा, आजारपणामुळे, जास्त काळ […]

Posted inHealth Article

रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..

रक्ताच्या उलट्या होणे : अनेक कारणांमुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. रक्ताच्या उलट्या होणे ही दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नाही. याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातकही ठरू शकते. त्यामुळे जर रक्ताच्या उलट्या होत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.  या त्रासावर त्वरित उपचार होणे आवश्यक असते. रक्ताच्या उलट्या कशामुळे होतात..? 1) पचनसंस्थेतील बिघाडामुळे.. पोटातील अल्सर, ऍसिडिटी, गॅस्ट्रो, जठराला सूज […]

Posted inHealth Article

अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे उपाय

गर्भधारणा टाळण्याचे उपाय : गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक सुरक्षित पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. यांचा वापर केल्याने नको असलेली गर्भधारणा टाळता येणे शक्य असते. मात्र काहीवेळा पुरेशी खबरदारी न घेतल्याने म्हणजे सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे, कंडोम फाटण्यामुळे किंवा रोजच्या गर्भनिरोधक गोळ्या खाणे विसरल्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यताही असते. […]

Posted inHealth Article

i-Pill गोळ्यांचा कधी व कसा वापर करावा ते जाणून घ्या

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या – अनावश्यक गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. असे असूनही अनेकदा पुरेशी खबरदारी न घेतल्याने अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यताही असते. विशेषतः लैंगिक संबंधामध्ये कंडोमसारख्या साधनांचा वापर न करणे, किंवा सेक्समध्ये कंडोम फाटणे, नियमित घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास विसरणे किंवा कॉपर टी गर्भाशयातून गळून […]

Posted inHealth Article

प्रेग्नन्सीतील व्यायाम : Pregnancy Exercise Tips

गर्भावस्था आणि व्यायाम – Pregnancy & Exercise : प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करण्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे प्रेग्नन्सीतही प्रेग्नंट स्त्रीने रोज हलका व्यायाम करणे आवश्यक असते. यामुळे Normal delivery होण्यास मदत होत असते. प्रेग्नन्सीतील व्यायाम टिप्स : • प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. • डॉक्टरांनी व्यायाम करण्यास सांगितल्यास त्यांच्या सूचनेप्रमाणे हलका व्यायाम सुरू करावा. […]

Posted inHealth Article

Pre-eclampsia: प्री-एक्लेम्पसिया कारणे, लक्षणे व उपचार

प्री-एक्लेम्पसिया (Preeclampsia) : प्रेग्नन्सीमध्ये अनेक गरोदर स्त्रियांना Pre-eclampsia (प्री-एक्लेम्पसिया) ही गंभीर समस्या होत असते. यामुळे गर्भवती आणि पोटातील बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. यासाठी Pre-eclampsia वर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक असते. भारतात साधारण 10% गरोदर स्त्रियांमध्ये ही स्थिती निर्माण होऊ शकते. प्री-एक्लेम्पसिया कारणे (Preeclampsia Causes) : गरोदरपणात जेंव्हा अपरा (प्लेसेंटा) योग्यरीत्या काम करीत […]

Posted inHealth Article

पाईल्सवरील आयुर्वेदिक औषध उपचार

पाईल्स आणि आयुर्वेदिक औषध उपचार : पाईल्सच्या त्रासाला आयुर्वेदात अर्श किंवा मूळव्याध असे म्हणतात. Piles मध्ये संडासच्या ठिकाणच्या शिरा सुजतात त्यामुळे त्याठिकाणी वेदना, जळजळ होत असते. आयुर्वेदात पाईल्सचे शुष्क अर्श आणि रक्तार्श असे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. शुष्क अर्श यामध्ये पाईल्सच्या त्रासात कोंब येणे, गुदभागाच्या नसा सुजणे, त्याठिकाणी आग, जळजळ व वेदना अशी लक्षणे […]

Posted inHealth Article

लैंगिक संबंधानंतर स्त्रीमध्ये गर्भधारणा किती दिवसात होत असते ते जाणून घ्या..

गर्भधारणेसाठी प्रयत्न करणार्‍या महिलांमध्ये त्यांच्या मनामध्ये गरोदरपणाबद्दलचे अनेक प्रश्न येत असतात. काही स्त्रिया त्यांच्या गर्भावस्थेबद्दल आनंदी असतात, तर काहीजणींना भीतीही वाटत असते. लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा किती दिवसात होते असे प्रश्न अनेकांना पडत असतात. गर्भधारणा कधी होऊ शकते..? जर बर्थ कंट्रोल पिल्स (म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या) किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा वापर न करता स्त्री आणि पुरुषामध्ये सेक्स […]

Posted inHealth Article

गरोदरपणात पहिल्या महिन्यात जाणवणारी लक्षणे

गरोदरपणाचा पहिला महिना हा साधारण शेवटच्या मासिक पाळीनंतर तीन आठवडयांनी सुरू होतो. पहिल्या महिन्यात 5 आठवड्यानंतर गरोदर स्त्रीमध्ये शारीरिक बदल जाणवू लागतात. गर्भारपणाच्या या सुरवातीच्या दिवसांत स्त्रीच्या शरीरात होणारे बदल आणि या बदलांमुळे जाणवणारी लक्षणे यांची माहिती येथे दिली आहे. पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. गर्भ हा पहिल्या 3 महिन्यात अस्थिर स्वरूपात असून […]

Posted inHealth Article

मुतखडा जाण्यासाठी कोथिंबीरचा रस प्यावा की पिऊ नये ?

कोथिंबीर आणि किडनी स्टोन : किडनी हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. बदललेली जीवनशैली, चुकीचे खानपान या सर्वांचा आपल्या किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळेच अनेकजण मुतखडा किंवा किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहेत. अशावेळी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुतखडावर नानाविध उपाय करीत असतात. मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते. काही लोक सोशल मीडियावरील मेसेज वाचून मुतखडा पडण्यासाठी कोथिंबिरीचा […]