Posted inDiseases and Conditions

Pneumonia: न्यूमोनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

न्यूमोनिया (Pneumonia) : न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. न्यूमोनिया होण्याची कारणे […]

Posted inChildren's Health

डांग्या खोकला आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

डांग्या खोकला (Whooping cough) : डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping cough किंवा पेरट्युसिस (pertussis) असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो. डांग्या खोकला हा […]

Posted inDiseases and Conditions

गालगुंड आजाराची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार

गालगुंड (Mumps) : गालगुंड हा एक विषाणूमुळे होणारा आजार असून याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍याकडे लाळ, नाकातील स्राव यामार्फत होत असतो. गालगुंड आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असणाऱ्या लाळेच्या ग्रंथी सूजतात. त्यामुळे या आजारात गाल फुगलेले दिसतात म्हणूनच गालगुंड आजाराला ‘गालफुगी’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होत असतो. गालफुगीची लक्षणे (Symptoms of mumps) […]

Posted inDiseases and Conditions

नागीण आजाराची लक्षणे, कारणे व उपचार : Nagin Disease treatment

नागीण आजार – Herpes zoster : नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या (chickenpox) आजार होत असतो. नागीण रोग कशामुळे होतो? Causes of Nagin rog : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना […]

Posted inInfectious Diseases

डेंग्यू तापाची लक्षणे, कारणे, प्रकार, निदान व उपचार : Dengue Symptoms

डेंग्यू ताप (Dengue Fever) – डेंग्यू ताप हा ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून ‘एडिस इजिप्ती’ या डासांची पैदास होत असते. डेंग्यू कशामुळे होतो? डेंग्यू हा रोग डेंग्यूच्या विषाणूमुळे होत असतो. डेंग्यूच्या विषाणूची लागण ही ‘एडिस इजिप्ती’ या […]

Posted inDiseases and Conditions

निपाह व्हायरसची लक्षणे, कारणे आणि उपचार – Nipah virus

निपाह म्हणजे काय..? निपाह हा एक गंभीर असा संसर्गजन्य रोग आहे. याचा फैलाव ‘निपाह व्हायरस’मुळे होत असतो. निपाह रोगाच्या वायरसची लागण ही डुक्कर आणि वटवाघळांमुळे होत असते. निपाह व्हायरस हा बाधित रुग्णाच्या मेंदूवर थेट हल्ला करतो. निपाह रोगामध्ये ताप, थकवा, अंगदुखी, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात. ‘निपाह’चा संसर्ग झाल्यास 4 ते 14 दिवस इन्क्युबेशन कालावधी असतो. […]

Posted inDiseases and Conditions

गजकर्ण नायटा : कारणे, लक्षणे व उपचार – Ringworm treatments

गजकर्ण नायटा – Ringworm : गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या […]

Posted inDiseases and Conditions

कावीळ का होते? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार

कावीळ (Jaundice) : कावीळ हे यकृतासंबधित आजारांचे एक लक्षण असू शकते. काविळला इंग्लिशमध्ये ‘Jaundice’ असे म्हणतात तर आयुर्वेदात ‘कामला’ या नावाने ओळखले जाते. कावीळ मध्ये त्वचा व डोळ्यांचा रंग पिवळा झालेला असतो. कावीळ म्हणजे काय? काविळमध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. रक्तामध्ये बिलीरुबीन (Bilirubin) चे प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते. बिलीरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये […]

Posted inInfectious Diseases

चिकनगुनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Chikungunya

चिकनगुनिया आजार – Chikungunya : चिकनगुनिया हा एक विषाणुजन्य आजार असून तो डास चावल्याने होत असतो. चिकनगुनियामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे असतात. तसेच चिकनगुनिया आजारातून बरे झाल्यानंतर बरेच दिवस सांधे दुखू शकतात. चिकनगुनिया होण्याची कारणे (Causes of Chikungunya) : जेंव्हा विषाणू बाधित एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्टस ह्या […]

Posted inDiseases and Conditions

क्षयरोग म्हणजेचं टीबी रोगाची लक्षणे, कारणे आणि उपचार – TB

क्षयरोग – Tuberculosis : क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात. क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. […]