Posted inDiet & Nutrition

शेपू भाजी खाण्याचे फायदे व तोटे – Shepu bhaji benefits in Marathi

शेपू भाजी ही पोटाच्या विकारात उपयुक्त असते. यामुळे पोट साफ न होणे अशा समस्या दूर होतात. या भाजीमुळे हिमोग्लोबिन वाढते. मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतात. शेपूमध्ये महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी शेपू भाजी फायदेशीर असते. वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच मधुमेह रुग्णांसाठी ही भाजी चांगली असते. असे अनेक फायदे शेपू भाजी खाण्यामुळे होतात.

Posted inDiet & Nutrition

घोळाची भाजी खाण्याचे फायदे व तोटे : Ghol Bhaji benefits in Marathi

आरोग्यासाठी घोळीच्या भाजीचे अनेक फायदे असतात. घोळची भाजी अन्नपचनास मदत करते, यामुळे यकृताचे कार्यही सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी घोळ भाजी चांगली असते. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-A चे प्रमाण घोळ भाजीत अधिक असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वजन कमी करण्यासाठी घोळ भाजी उपयुक्त असते. यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढते. असे घोळ भाजी खाण्यामुळे विविध फायदे होतात.

Posted inDiet & Nutrition

अंबाडीची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान – Health Benefits of Ambada Bhaji in Marathi

अंबाडा भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे वजन आटोक्यात राहते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते, केसांचे आरोग्य चांगले राहते, हिमोग्लोबिन वाढते आणि लघवीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. आरोग्यासाठी असे विविध फायदे अंबाडी भाजी खाल्ल्याने होतात.

error: