Brinjal nutrition contents in Marathi

वांगे खाण्याचे फायदे :

वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात असे असूनही त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही सरस ठरतात.

100 ग्रॅम वांग्यातून मिळणारे पोषकघटक –

100 ग्रॅम वांग्यामधून 35 कॅलरीज उर्जा मिळते. त्यातील केवळ 2 कॅलरीज उर्जा ही वांग्यातील फैट्स स्निग्धपदार्थां पासून मिळते. त्यामुळे वांगी हे लो कॅलरीज आहार असल्याने वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
100 ग्रॅम वांग्यामधून 9ग्रॅम कर्बोदके, 1ग्रॅम प्रथिने आणि 1ग्रॅम पेक्षाही कमी प्रमाणात फैट्स असते.
वांग्यामध्ये विटामिन B6, थायमिन आणि विटामिन K चे प्रमाण भरपूर असते.
वांग्यामध्ये मैंगनीज या खनिजतत्वाचे प्रमाण अधिक असते.

वांगी कैन्सरचा धोका कमी करतात..
वांगी हे तंतुमय पदार्थ आणि Phytonutrients चा उत्तम स्त्रोत आहेत.
तंतुमय पदार्थांमुळे हृद्याचे आरोग्य, पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
तर वांग्यातील Phytonutrients हे एन्टिऑक्सिडंट चे कार्य करतात. त्यामुळे विविध कैन्सर आणि हृद्यविकार होण्याचा धोका कमी होतो.

वांग्यामध्ये Chlorogenic acid या एन्टिऑक्सिडंट कार्य करण्यास उपयुक्त असणाऱया घटकाचे प्रमाण अधिक असते. यामुळे कैन्सरचा धोका कमी होतो तसेच LDL वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

वांग्याच्या सालीमध्ये Nasunin नामक एन्टिऑक्सिडंट कार्य करणारे तत्व आढळते. यामुळे कैन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

वांगी कोणी खाऊ नयेत –
मुतखडे, पित्ताशयातील खडे, ऑस्टीओपोरोसिस विकारांनी पीडीत रुग्णांनी वांगी खाऊ नयेत.

विविध आहार घटकांची, फळांची, भाज्यांतील पोषकतत्वे यांची मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...