Blood on call 104 Dial service In Maharashtra.

ब्लड ऑन कॉल अर्थात जीवनामृतसेवा योजना :

जेव्हा जेव्हा रुग्णाला रक्त किंवा रक्तघटकांच्या संक्रमणाची गरज असते, तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त पेढीचा पत्ता विचारात फिरावे लागते व रक्त व रक्तघटक मिळण्यासाठी अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. ह्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 104 हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे.

Blood on call 104 Dial service In Maharashtra.

ब्लड ऑन कॉल सेवेमध्ये 104 या हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यास शितसाखळी पेटीद्वारे रक्त व रक्तघटकांचा पुरवठा मोटारसायकलवरून जिल्हा रुग्णालयापासून 40 किलोमीटरच्या आसपास किंवा एका तासात पोहोचवण्यात येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्लड ऑन कॉल – Dial 104 :

रक्त किंवा रक्त घटकांची गरज असल्यास 104 या Toll Free Number वर कॉल करावा.

जवळची ब्लड बँक शोधा :
जिल्ह्यांनुसार जवळची ब्लड बँक शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

Source – महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग