जखम होणे, रक्तप्रवाह होणे

2915
views

जखम लहान असू दे किंवा मोठी; त्यातून रक्त येण्याची दुर्घटना सर्रास घडतात. जखम झाल्यामुळे त्वचा फाटून रक्तप्रवाह होतो. काही वेळेस जखम मोठी असल्यास रक्त भळाभळा वाहतं.
‎•  त्या भागाला साबण लावुन कोमट पाण्याने धुवा, जर काही धुळ असेल तर धुवुन टाका.
‎•  जर रक्त येत असेल तर त्यावर जंतुसंसर्गापासुन वाचण्यासाठी डेटॉल किंवा हळद लावा.
•  जखमेतून खूप रक्तप्रवाह होत असल्यास, मुका मार लागला असल्यास किंवा जखमेची इतर काही लक्षणं दिसत असल्यास ड्रेसिंग पॅड वापरा किंवा जखमेवर हात घट्ट दाबून ठेवा. जखमी झालेला अवयव वर उचलून धरा जेणेकरून रक्तप्रवाह कमी होईल.
•  ‎रक्त वाहणे कमी झाल्यावर जखमेला ड्रेसिंग करा. बँडेज साधारण घट्ट बांधा.
•  ‎जर कापलेली जखम खोल असेल, तर त्वरीत डाँक्टर कडे जा.
•  ‎जखमी व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांची मदत मिळवून द्या.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.