अंजीर फळ – Fig Fruit :

अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा अधिक जास्त पौष्टीक असते.

Image of Fig Fruit.

अंजीर फळातील पोषकतत्वे –

अंजीर हे अनेक खनिजतत्वे, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असून अंजीराच्या फळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, फायबर्स, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. तसेच यात फॅटचे प्रमाणही अत्यल्प असून ते कोलेस्टेरॉल फ्री असते. अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अंजीरमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्याने नियमित पोट साफ होण्यासाठी मदत होते. यामुळे पित्ताचा त्रास देखील कमी होतो. अंजीर खाण्यामुळे रक्त वाढते, थकवा दूर होतो. तोंड येणे यावर ते उपयुक्त असते. अंजीरमुळे त्वचाविकार कमी होण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी ते चांगले असते.

अंजीर खाण्याचे 8 आरोग्यदायी फायदे –

1) बद्धकोष्ठता दूर होते..
नियमित पोट साफ न होण्याची तक्रार असल्यास अंजीर खावे. कारण यामध्ये फायबर्स (तंतुमय पदार्थ) भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. अंजीर खाण्यामुळे मूळव्याधीचा त्राससुध्दा कमी होण्यास मदत होते. मूळव्याधविषयी माहिती जाणून घ्या..

2) पित्त कमी करते..
अंजीर हे थंड गुणाचे आणि पित्तशामक असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर हितकारी आहे.

3) थकवा दूर करते..
अंजीर फळ खाण्यामुळे शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्यास अंजीर खाणे फायदेशीर आहे.

4) रक्ताचे प्रमाण वाढवते..
अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील रक्ताची वाढ होण्यास उपयुक्त ठरते.स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव कमी होत असेल किंवा ज्यांच्या अंगात हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी रोज एक-दोन अंजीर खाणे फायदेशीर असते.

5) हृदयासाठी हितकारी..
अंजीरमध्ये हृदयासाठी हितकारी असणारे ओमेगा-3 व ओमेगा-6 फॅटी ऍसिड हे घटक भरपूर असतात. त्यामुळे हृद्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

6) त्वचाविकार कमी करते..
अंजीर हे रक्तशुद्धीकर आणि पित्तनाशक असल्याने पांढरे डाग, शीतपित्त यासारख्या अनेक त्वचेच्या विकारांमध्ये अंजीर उपयुक्त ठरते.

7) तोंड येत असल्यास..
तोंड येणे या त्रासामध्ये ओठ, जीभ, तोंड यांना फोड येतात. अशावेळी अंजीरमुळे या जखमा लवकर भरून येतात. याशिवाय पायांना भेगा पडल्यास तेथे कच्च्या अंजीराचा चीक लावणे उपयुक्त ठरते.

8) दमा आणि खोकल्यावरही गुणकारी..
अंजीर खाण्यामुळे दमा आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.

अंजीर खाण्याचे तोटे –

अंजीर हे पचनास जड आहे. त्यामुळे अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन पोटदुखीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पचनशक्ती विचारात घेऊनच योग्य प्रमाणात अंजीर खावेत.

अंजीर कोणी खाऊ नये..?

मधुमेही रुग्ण ताजे अंजीर खाऊ शकतात मात्र सुके अंजीर खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे सुद्धा वाचा – केळी खाण्यामुळे होणारे फायदे व तोटे जाणून घ्या..

Read Marathi language article about Fig Fruit Health benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *