दमा कोणकोणत्या कारणांमुळे होतो

685
views

अस्थमा कारणे : 
शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते.

अन्य सहाय्यक कारणे –
खालिल कारणे ही दमा रुग्णांमध्ये दम्याचा वेग (Asthma attack) उद्भवण्यास सहाय्यक कारक ठरतात.
◦ ढगाळ वातावरण, हिवाळा, पावसाळा ह्या सारख्या आद्र वातावरणामुळे दमा वेग येतो,
◦ धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, पेंट्स, उग्र वास असणाऱया पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे दम्याचा वेग येतो,
◦ शारीरीक अतिपरिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे,
◦ हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे,
◦ वायु प्रदुषणामुळे,
◦ सर्दी, फ्लू, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,
◦ मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.