गुणकारी कोहळा :
कोहळा या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानेही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत, स्निग्ध गुणांचा असून वात-पित्त कमी करणारा, बुद्धीवर्धक आणि बल वाढवणारा आहे. येथे कोहळा चे औषधी उपयोग याविषयी माहिती दिली आहे.
कोहळाचा आहारातील वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य, पचनशक्ती , मानसिक आरोग्य, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा अशा विविध समस्यांवर कोहळा गुणकारी असतो.
कोहळा औषधी उपयोग :
• कोहळा खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
• ऍसिडिटी होत असल्यास कोहळा रसात थोडी हिंग घालून ते दिवसातून दोन वेळा घ्यावे.
• नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास कोहाळ्याचा रस सेवन करावा.
• मळमळ, उलट्या व डोकेदुखी होत असल्यास चार चमचे कोहळ्याचा रसात साखर मिसळून मिश्रण घ्यावे.
• मुळव्याध असल्यास कोहळ्याचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते.
• मुतखडा असल्यास किंवा लघवीला जळजळ होत असल्यास कोहाळ्याचा रस प्यावा.
• प्रजनन क्षमता कमी असणाऱ्या पुरुषांसाठी कोहळा खाणे फायदेशीर असते.
• फिट येत असल्यास 1 चमचा गाईचे तूप, 9 चमचा ज्येष्टमध चूर्ण, 9 चमचा कोहाळा रस हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे.
• मुलांची बुद्धी व स्मरणशक्ती वाढण्यासाठीही कोहळ्याचा उपयोग होतो.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.