नॉर्मल डिलीवरी होत नसल्यास सिझेरियन ऑपरेशन केंव्हा करावे लागते..?

9398
views

Delivery marathi delivery marathi video normal delivery normal delivery tips in marathi video normal delivery

नॉर्मल डिलीवरी होणे अशक्य किंवा अवघड बनल्यास आपले डॉक्टर खालील तीन पर्याय वापरून प्रसूतीची प्रक्रिया पुर्ण करतात.
1) बाळंतपणाच्या वेळी चिमटा लावणे
2) व्ह्याकुम/ व्हेन्टोज डिलीव्हरी
3) सिझेरियन पद्धत वापरणे
 

1) बाळंतपणाच्या वेळी चिमटा लावणे (फोर्सेप्स लावणे) :
बाळंतपण जर लांबत चालले आणि त्यात अडचण यायला लागली तर चिमट्याचा उपयोग केला जातो. बाळ बाहेर यायला उशीर लागला तर बाळ आणि मातेच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी आपले डॉक्टर Forcep म्हणजे चिमटाच्या सहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.
चिमटा लावताना भूल दयावी लागते तसेचं बाळाचे गर्भाशय फिरणे याचा अचूक अंदाज घेऊन त्याच्या तोंडावर, डोक्यावर कुठेही इजा होणार नाही अशाप्रकारे चिमट्यात त्याला पकडावे लागते.
कित्येक वेळा चिमटाच्या खुणा बाळाच्या डोक्याला तशाच रहातात. पण काही दिवसात निघून जातात. चिमट्यामुळे जर बाळाला इजा झाल्यास त्याची बौद्धीक वाढ खुंटणे, डोळ्यांना इजा होणे, बहिरेपणा येणे अशाही समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून हल्ली डॉक्टर forcep चा वापर कमी प्रमाणात करतात.


विशेष सूचना (कॉपी पेस्ट संबंधी) : ही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अनेकजण आमची उपयुक्त माहिती आमच्या परवानगी शिवाय कॉपी पेस्ट करून विडिओ, फेसबुक वैगरेवर आपल्या नावाने प्रसिद्ध करीत आहेत. तसा प्रकार आढळल्यास कॉपीराईट कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी ही सूचना दिली आहे. © कॉपीराईट हेल्थमराठी डॉट कॉम.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

2) व्ह्याकुम (Vacuum extraction) डिलीव्हरी :
प्रसुतीला वेळ लागत असल्यास कळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास Vacuum चा वापर करतात.
यामध्ये शंखाकृती तबकडी असते. ते बाळाच्या डोक्यावर ठेऊन त्यात हवेची पोकळी निर्माण केली जाते व हवेच्या दाबाने ठरावीक ओढ देऊन बाळाला बाहेर काढले जाते. यामध्येही बाळाच्या टाळूला इजा होणे, मेंदुमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

3) सिझेरियन :
सिझेरियन म्हणजे योनीमार्गातून बाळ बाहेर न आणता ओटीपोटावर छेद देऊन ऑपरेशनद्वारे बाळ पोटावरून बाहेर काढणे. ओटीपोटाला एक छोटीशी आडवी चीर देऊन गर्भाशयापर्यंत पोहचून प्रथम बाळ बाहेर काढले जाते. नंतर वार काढली जाते. गर्भाशय रिकामे केले जाते व सर्व भाग परत शिवला जातो. ऑपरेशनआधी मातेला भूल दिली जाते.

ऑपरेशननंतर घ्यायची काळजी –
शस्त्रक्रियेनंतर पहिले 24 तास वेदना होत असल्यामुळे झोपेची व वेदना कमी करणारी औषधे देवून वेदना कमी केल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्त्री उठून बसू शकते, उभे राहता येते, चालता येते, तसेच बसून स्तनपानही करता येते. ऑपरेशननंतर साधारण 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागते.

सिझेरियन केंव्हा करावे लागते..?
• बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची खात्री होणे.
• ओटीपोटात मुलाचे थांबणे, मूल आडवेतिडवे किंवा पायाळू असल्यास.
• बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास.
• बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुरफटली जाणे.
जर वार ही गर्भाशयाच्या खालच्या भागात असल्यास (Placenta Previa). ‘प्लॅसेंट प्रिव्हिया’ म्हणजे खालच्या भागात वार असल्यास ( नेहमी ती वरच्या भागात असते ) ती गर्भारपणाच्या शेवटच्या काळात सुटून रक्तस्त्राव होऊ लागतो. नैसर्गिकरित्या प्रसूती अशा प्रसंगी कठीण असते तेंव्हा सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते.
• पूर्वीच्या बाळंतपणात दोन वेळा सिझेरियनची शस्त्रक्रिया झालेली असल्यास.
• मातेचे काही आजार- उदा. मधुमेह, हृद्यविकार, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर,ओटीपोटात मोठी गाठ, गरोदरपणात रक्तदाब खूपच जास्त असणे व त्यामुळे आकडी येणे इ. असल्यास.
• मातेचे वय 30 पेक्षा जास्त असल्यास.
तसेचं नैसर्गिक प्रसूतीमध्ये अडचणी येऊन बाळाचे डोके ठरावीक वेगाने खाली सरकले नाही किंवा गर्भाशयाचे तोंड उघडायला वेळ लागला इ. समस्या अचानक येऊ शकतात. अशा वेळी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न सोडून देऊन सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. यामध्ये प्रेग्नन्सी, डिलिव्हरी व बालसंगोपन याविषयी परिपूर्ण माहिती दिली आहे.

प्रेग्नन्सी व बाळंतपण संबंधीत खालील उपयुक्त माहितीपूर्ण लेख सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणकोणती लक्षणे जाणवितात..?
‎कसा असावा गर्भावस्थेतील आहार
‎गर्भावस्थेत करावयाच्या वैद्यकीय तपासणी व टेस्ट
‎गरोदरपणात घ्यावयाची काळजी व महत्वाच्या सूचना
‎प्रेग्‍नेंसी कैलेंडर मराठीत माहिती
‎कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..?
‎प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्स मराठीत
जोखमीचे गरोदरपण (High Risk Pregnancy)
‎गरोदरपणातील समस्या आणि उपाय
‎गरोदरपणातील मधुमेह समस्या आणि उपाय
‎गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या आणि उपाय
‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..
‎प्रसूतीची (डिलिव्हरीची) लक्षणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते..?
‎बाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे कोणती आहेत..?
सिझेरियन प्रसूतीसंबंधीत माहिती जाणून घ्या..
‎बाळंतपणानंतर कोणती काळजी घ्यावी..?

– डॉ. सतीश उपळकर
CEO, Health Marathi Network


Contains in this Article :

delivery marathi delivery marathi video normal delivery normal delivery tips in marathi video normal delivery video in india pregnancy delivery pregnancy delivery video in hospital live pregnancy tips for normal delivery in marathi video normal delivery video in marathi language Pregnancy Delivery information in Marathi – लेबर और डिलिवरी, Labour & Delivery Understand Childbirth pain marathi Special Delivery Tips for First Time Mothers Pregnancy tips care normal delivery in preganancy / बेबी नार्मल डिलीवरी के लिए क्या ..नॉर्मल डिलिवरी पाने के लिए उपयोगी टिप्स normal delivery marathi प्रसूती नंतर घ्यायची काळजी प्रसूती नंतर पहिल्या दोन दिवस आपल्याला व्यवस्थित शौचास होत नसेल याची वेगवेगळी नवमातेच्या सौंदर्यासाठी..! नवमाता सौंदर्य आरोग्य सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका – सिझेरियन डिलेव्हरी म्हणजे काय सिझेरियनची माहिती डिलेव्हरी नंतरचे व्यायाम उपाय बाळंतपण प्रेग्नन्सीत प्रसूतीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे नॉर्मल प्रसूती होण्याकरिता उपाय सिझेरियन झाल्यावर किती दिवसांनी शरीर संबंध ठेवू बाळाला पाजणं: स्तनपान आरोग्य cesarean delivery in marathi details cost| सिझेरियन समज-गैरसमज born baby care | नवजात अर्भकाची काळजी स्त्रीरोग-समज आणि गैरसमज | Strirog Samaj AniGairsamaj कारण टाके घालणं किंवा शस्त्रक्रिया ( फॉर्सेप्स किंवा सिझेरियन ) ही मुलाला गरोदरपण आणि प्रसूती काळजी बाळंतपणानंतरची काळजी बाळंतपण कसे होते? बाळंतपणानंतर आहार बाळंतपणानंतर संबंध प्रसुती कशी होते डायट प्लॅन तक्ता चार्ट बाळंतपणानंतरचे लैंगिक संबंध बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते? महिलांसाठी खास: वाचा बाळंतपणानंतर कोणता व्यायाम उपयुक्त कुटुंबनियोजनाच्या पध्दती family planning बाळंतपणानंतर आहार सिझेरियन ऑपरेशन खर्च किती येतो सिझेरियन नंतर काळजी सिझेरियन नंतर घ्यायची काळजी सीजर डिलीवरी ऑपरेशन सिझेरियन कसे करतात ऑपरेशन से डिलीवरी के बाद सावधानी सिजेरियन ऑपरेशन सिझेरियन नंतर आहार सिझेरियन नंतर काय खावे सी-सेक्शन (सिजेरियन डिलीवरी) – C-Section (Cesarean Delivery) in marathi mother care after cesarean delivery धोके स्तनपान breastfeeding नुकसान


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.