संधीवाताचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी

696
views

संधीवाताचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी : 
◦ संधिवात निर्माण करण्याऱया कारणांपासून दुर राहिल्यास संधिवातापासून दुर राहता येते.
जसे रुक्ष, शीत इ. वातवर्धक आहार घेऊ नये,
◦ अतिप्रवास करणे टाळावे,
◦ वजन वाढू देऊ नये, स्थुलतेमुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवावे,
◦ नियमित व्यायाम, योगासने करावीत,
◦ हाडांची झीज भरुन काढण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार सेवन करावा. कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे सुर्यकिरण अंगावर घ्यावे,
◦ आयुर्वेदिक वातशामक तेलांचा सांध्यांवर अभ्यंग करावा,
◦ थंडी, पाऊस, वारा यांपासुन शरीराचे रक्षण करावे.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.