प्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

After delivery care in Marathi, Pregnancy delivery care in Marathi.

बाळंतपणानंतरची काळजी (डिलीवरीनंतर काळजी) :

प्रेग्‍नेंसीनंतरही बाळंतणीची विशेष देखभाल करण्याची गरज असते. बाळंतपणानंतरही योग्य आहार घ्यावा तसेचं आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. त्यांच्याकडून नियमित तपासणी करून घेणे आणि डॉक्टरांनी केलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे असते.

बाळंतपणानंतर ताप येणे, पोट साफ न होणे, लघवीला त्रास होणे तसेच अंगावरून जाने, पोटात दुखणे अशा समस्याही उदभवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. थोडयाशा उपचारांनी ह्या समस्या बऱ्या होतात.

बाळंतपणानंतरचा आहार :
स्त्रि‍यांना गर्भावस्थेत जेवढा पोषक आहार महत्वाचा असतो तेवढाचं बाळंतपणानंतर ही पोषक आहार गरजेचा असतो. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटक मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूप महत्त्व असते.
• अशावेळी विटामिन, प्रोटीन युक्त सकस व चौरस आहार सेवन करावा.
• ‎दूध व दुग्धजन्य पदार्थ, लोणी, तुप इत्यादि पदार्थ खाणे आवश्यक त्यामुळे मातेमध्ये दुधाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊन त्याचा लाभ बालकास होईल.
• ‎दूध भरपूर येण्यासाठी हळीव, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस, खोबरे हे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे.
• ‎याशिवाय ताजी फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या व सूप आहारात अधिक घ्या.
• ‎त्याचबरोबर पाणीसुद्धा भरपूर प्यावे.
• ‎मांसाहार करत असल्यास अंडी व मांस आहारातून घ्या.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळंतपणानंतरही करावयाची तपासणी :
बाळाला जन्म देणं स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा असा क्षण असतो. बाळंतपणानंतर गर्भाशय हे हळूहळू आपल्या पुर्वीच्या अवस्थेला येऊ लागते. ही प्रक्रिया बाळंतपणानंतर सहा आठवडयांपर्यंत (42 दिवस ) चालू राहते. सहा आठवड्यानंतर डॉक्टर तपासणी करून शरीर पूर्वावस्थेत आले आहे की नाही हे तपासतात.

तपासणीच्या वेळेस डॉक्टर खालील बाबी तपासतील :
आपले वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन, आणि आपल्या गर्भाशयाची तपासणी करतात.
तसेच प्रसूतीनंतर घ्यावयाचा आहार, प्रसूतीनंतरचा व्यायाम, बाळाचे आरोग्य, स्तनपान, लसिकरण संबंधी माहितीही आपले डॉक्टर देतील. बाळंतपणानंतरही आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. त्यांच्याकडून नियमित तपासणी करून घ्या आणि आपल्या डॉक्टरांनी केलेल्या सुचनांचे पालन करा.

बाळंतपणानंतर व्यायाम :

बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे सैल पडते. अशावेळी थोड्यास्या व्यायामाची गरज असते.
यासाठी हातापायांची हालचाल करावी, चालण्याचा व्यायाम करावा, काही सोपी योगासने करावीत.
आपण बाळंतपणानंतर हळूहळू चालण्यास सुरवात करू शकता आणि चालताना आरामदायक चप्पल घालावे.
आजकाल गर्भावस्थेनंतर अधिकतर महिला आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र आपल्या डॉक्टरांच्या सुचनेशिवाय असा कोणताही व्यायाम करू नका की ज्यामुळे पुढे नविन समस्या निर्माण होईल. प्रेग्‍नेंसीमध्ये वाढलेले वजन कमी होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.

नोकरी करणाऱ्या स्त्रियां बाळंतपणानंतर 4 ते 5 महिन्यानंतर पुन्हा ऑफिसला जाऊ शकतात.
आत्ता ‘मॅटर्निटी बेनिफिट्स अ‍ॅक्ट’ नुसार बाळंतपणानंतर 26 आठवडयांची (साडेसहा महिने) मातृत्व रजा मिळते.

प्रसूतीनंतर शारीरिक संबंध (सेक्स) कधी ठेऊ शकता..?
प्रसूतीनंतर साधारण चार ते सहा आठवड्याच्यानंतर लैंगिक संबंध चालू करू शकता. प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा जसे, बाळंतपण कोणत्या प्रकारचे झाले, नॉर्मल की सिझेरिअन, गुंतागुंतीची प्रसुती झाली का किंवा ऑपरेशनमध्ये किती टाके पडले या गोष्टींचाही विचार करावा लागतो. अशावेळी आपल्या डॉक्टरांचा सल्लाही घेणे गरजेचे असते. विशेषतः सिझेरियन ऑपरेशननंतर सुरवातीला जास्त काळजी घ्यावी लागते कारण यात पोटाला आणि गर्भाशयाला छेद दिला जातो. त्यामुळे सिझेरियननंतर किमान सहा आठवडे पोटावर आणि गर्भाशयावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सिझेरियन झाल्यावर किमान दीड ते दोन महिने शारीरिक संबंध टाळावेत.

तसेच स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी विचारात घेतली पाहिजे. सेक्स संबंध चालू करीत असताना लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणेसुद्धा गरजेचे आहे. स्त्रीच्या आरोग्याचा विचार करता दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणेही गरजेचे आहे. शिवाय नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीला आपल्या बरोबरच बाळाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवून लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणेसुद्धा गरजेचे आहे.

प्रसूती नंतर मासिक पाळी कधी सुरू होते..?
बाळ जन्मल्यानंतर स्त्रीची मासिक पाळीचे चक्र हळूहळू पूर्वरत होऊ लागते. प्रसूतीनंतर मासिक पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येऊ शकते तर काही स्त्रियांना एक किंवा दोन वर्षं पाळीच येत नाही. मासिक पाळी सुरू होण्याची क्रिया ही स्त्रीच्या बाळास स्तनपान करण्याशी आणि हार्मोन्स या दोन्हीसंबंधित असते. जसजसे बाळ अंगावर दूध कमी पिऊ लागते तशी पाळीचे चक्र सुरू होण्यासाठीची प्रक्रिया सुरू होऊ लागते.

संबंधित खालील माहितीपूर्ण लेखही वाचा..
सिझेरियन डिलिव्हरी माहिती व काळजी
‎डिलिव्हरी किंवा बाळंतपण संबंधीत सर्व काही माहिती जाणून घ्या..
नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी
बाळास स्तनपान कसे करावे
बाळाचा वरचा आहार कसा सुरू करावा

after delivery food for mother in marathi, care after c section delivery in marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.