गर्भपात झाल्यास अशी घ्यावी काळजी.. (After Abortion Care in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भपात (Abortion) :

जेव्हा गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यापूर्वी गर्भाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला गर्भपात म्हणतात. गर्भपात हा पूर्ण किंवा अपूर्णही होऊ शकतो. पूर्ण गर्भपातमध्ये मृत गर्भ हा योनीतून पूर्णपणे बाहेर पडत असतो. तर अपूर्ण गर्भपातात मृत गर्भाचा काही भाग बाहेर येऊ शकतो तर काही गर्भाशयात राहू शकतो.

जर अपूर्ण गर्भपात झाल्यास मृत गर्भाचा काही भाग गर्भाशयात राहतो. अशावेळी तो गर्भ काढून न टाकल्यास त्यामुळे गर्भाशयात इन्फेक्शन होऊ लागते. परिणामी त्या स्त्रीच्या जीवास धोका वाढतो, स्त्रीचे गर्भाशय कायमस्वरूपी निकामी होऊ शकते तसेच अतिरक्तस्राव होऊन स्त्री मृत्युमुखी पडू शकते. त्यामुळे गर्भपात झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.

गर्भपात झाल्यावर अशी घ्यावी काळजी :

गर्भपात झाल्यानंतर योग्य ती काळजी व खबरदारी घेणे आवश्यक असते.
• गरोदरपणात योनीतून अधिक रक्तस्राव झाल्यास, पोटात अतिशय वेदना होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
• गर्भपात झाल्यानंतर ताप येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. तापाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे गर्भपात झाल्यानंतर इन्फेक्शनचे (संक्रमणाचे) लक्षण असू शकते.
• गर्भपात झाल्यानंतर अधिक रक्तस्राव होत असल्यास डॉक्टरांकडे तात्काळ जावे.
• गर्भपात झाल्यानंतर काही काळ शारीरिक संबंध ठेवणे टाळावेत.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.