मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना मराठीत माहिती (Mukhyamantri Sahayata Nidhi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Information about Mukhyamantri Sahayata Nidhi Maharashtra

सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व अडचणीत सापडलेल्या रूग्णांना आधार देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी/कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून दोन वर्षात 5 लाख रूग्णांसाठी 200 कोटीचे अर्थसहाय्य केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
शासन निर्णयानुसार राज्यातील गरजू व गरीब रूग्णांवरील शस्त्रक्रिया / उपचारासाठी निधीतून अंशत: अर्थसहाय्य रुग्णालयाचे नांवे प्रदान केले जाते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :
(1) वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च एक लाखाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हॉस्पिटलचे कोटेशन प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
(2) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.
(3) महाराष्ट्रातील रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला
(4) आधार कार्ड
(5) तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. 1.0 लाखापेक्षा कमी असलेबाबत)
(6) मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र

उपचार घेणार त्या हॉस्पिटलची माहितीही अर्जामध्ये द्यावी लागते यासाठी,
• हॉस्पिटलचे नाव, पत्ता व फोन नंबर
• हॉस्पिटलचे बँक खाते क्रमांक
• हॉस्पिटलचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव, IFSC कोड व शाखा
• हॉस्पिटलचा ई-मेल

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

महत्वाची टीप :
सदर मदत हि प्रत्येक रुग्णास 3 वर्षातून एकदा देण्यात येईल. उपरोक्त गोष्टिंची पूर्तता केल्यानंतर अंशत: 10 हजार ते 3 लाखापर्यंत अर्थसहाय्य करण्यात येते.

संपर्क – Contact Details :
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, 6 वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मुंबई
दूरध्वनी क्रमांक – 022-22026948
वेबसाईट – https://cmrf.maharashtra.gov.in/index.action

mukhyamantri sahayata nidhi application, address, pan number, documents, contact no