दोन महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी दोन महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली आहे.
दोन महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 4.4 ते 7.0 किलो आणि उंची 61 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 4.0 ते 6.4 किलो असते आणि उंची सुमारे 58 सेमी पर्यंत असू शकते.दोन महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
या महिन्यात बाळ नजर स्थिर ठेऊ शकते. बाळ हसते, ओळखीची माणसे पाहून हसणे. बाळाला पाठीवर झोपवले असता ते आपली मान बाजूला हलविते. या महिन्यात बाळाला काहीवेळ पोटावर झोपवल्यास ते आपले डोके थोडे वर करू लागते. वेगवेगळ्या आवाजात रडते.
दोन महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
पहिले सहा महिने नवजात बालकाचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे दुसऱ्या महिन्यातही बाळाला स्तनपान करावे. दोन महिन्याची बालके दिवसभरात सात ते आठ वेळा स्तनपान करू शकतात. आईचे दुध सोडून बाळास इतर कोणताही आहार 2ऱ्या महिन्यात देऊ नये. त्यामुळे बाळास पाणी, ग्राईप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गुटी वैगरे काहीही देऊ नये.
काही परिस्थितीत बाळास आईचे दूध देता येत नसल्यास पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. दुसऱ्या महिन्यात फॉर्म्युला दूध देताना बाळाला साहा ते सात वेळा थोडे थोडे फॉर्म्युला दूध दिले पाहिजे.
दोन महिन्याच्या बाळाची झोप :
दोन महिन्याचे बाळ दिवसभरात एकूण 15 तासापर्यंत झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
दोन महिन्याच्या बाळाचे लसीकरण :
दुसऱ्या महिन्यात बाळाला दीड महिना किंवा सहा आठवडे पूर्ण झाल्यावर खालील तीन लसी दिल्या जातात.
• पोलिओ (1) – बाळाला सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पोलिओचा पहिला डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
• डी.पी.टी. (1) – याला ट्रिपल लस किंवा त्रिगुणी लस असेही म्हणतात. बाळाला सहा आठवडे पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा पहिला डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
• हेपाटिटिस बी (2) – हेपाटिटिस बी ची दुसरी लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.दुसऱ्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
दुसऱ्या महिन्यात बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलण्यासाठी हळूहळू प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्याची मान, खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते. याशिवाय,
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.डॉक्टरांकडे कधी जावे..?
दुसऱ्या महिन्यात बाळ दूध पीत नसल्यास किंवा त्याला ताप, अतिसार, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.
दोन महिन्याच्या बाळाचा आहार, वजन आणि झोप अशी असावी – 2 month baby care tips in Marathi
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.