108 रुग्णवाहिका सेवेची माहिती (108 Ambulance Service Maharashtra)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

महाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प
जीवनदायी रुग्णवाहिका : Dial 108

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखालील तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्पामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची आरोग्य सेवा (जीवनदायी रुग्णवाहिका) देण्यात येते. त्यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेले रुग्ण, सर्व गंभीर आजार, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशु संबंधातील आजार, साथीचा रोगाचा झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखिमीमुळे झालेले रुग्ण, गंभीर हृदयरोगी रुग्ण, सर्पदंशाचे रुग्ण, सर्व अपघात, अन्नातून विषबाधा, श्वसनाचे रोग, मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो .

108 रुग्णवाहिका सेवेची ठळक वैशिष्ठ्ये :

• राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम व महाराष्ट्र शासन यांचे अंतर्गत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
• ‎तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी 108 हा दूरध्वनी क्रमांक निर्देशित करण्यात आला आहे.
• ‎“गोल्डन अवर थियरी “ वर आधारित योजना 108 क्रमांकाद्वारे रुग्णाला पहिल्याच तासात सर्वात जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. ही सेवा वर्षातील 365 दिवस व 24 x 7 उपलब्ध असेल व रुग्णांना मोफत पुरविण्यात येईल.
• ‎रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या साथी, गंभीर आजार व तदनुषंगिक समस्या, ह्या तातडीच्या परिस्थिती शिवाय गरोदर स्त्रिया व नवजात बालके यांच्याशी निगडीत तातडीची परिस्थिती सुद्धा हाताळली जाईल.
• ‎तातडीच्या प्रतिसादात्मक सेवांमध्ये संगणक तंत्रज्ञानाचे एकीकरण, ध्वनी नोंद प्रणाली, भौगोलिक माहिती प्रणाली ( GIS), भौगोलिक स्थिती प्रणाली ( GPS), स्वयंचलित वाहन ठावठिकाणा प्रणाली (AVLT), व फिरती दळणवळण सेवा (MCS), यांचा समावेश असेल.
• ‎रुग्णावाहीका प्रगत जीवनाधार प्रणाली (ALS) व प्राथमिक जीवनाधार प्रणाली (BLS) ने सुसज्ज.
• ‎ह्या वैद्यकीय उपकरणांमध्ये रुग्णवाहिकेतील खाट, स्कूप स्ट्रेचर, रेकॉर्डर सहित बाय-फेझिक डेफिब्रीलेटर कम कार्डीयाक मॉनिटर, ( फक्त ALS करिता ). ट्रान्स्पोर्ट व्हेंटिलेटर, ( फक्त ALS करिता ), पल्स ऑक्सिमीटर ( फक्त BLS करिता ), सक्शन पंप, प्राणवायूचा सिलिंडर इत्यादीचा समावेश.
• ‎रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी, तातडीचे डॉक्टर, वैद्यकीय नियंत्रण, रुग्णवाहिका डॉक्टर, कर्मचारीवर्ग यांना प्रशिक्षण देण्यात येते.
• ‎रुग्णवाहिका वैद्यकीय कर्मचारी व प्रशिक्षित चालक असलेल्या आणीबाणीतील वैद्यकीय तंत्रज्ञाकडून परीचालीत
• ‎तीन पाळ्यांमध्ये 24 x 7 उपलब्ध असणारा रुग्णवाहिका कर्मचारी वर्ग.
• ‎महाराष्ट्रातील कुठल्याही नेटवर्क मधून तीन अंकी 108 ह्या मोफत क्रमांकावर दूरध्वनी करून 24 X 7 तातडीची सेवा उपलब्ध.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

सदैव लक्षात ठेवा ‘108’ हा जीवनदायी रुग्णवाहिकेचा क्रमांक..

रस्ते अपघात किंवा एखाद्यास हार्ट अटॅक आल्यास, साप चावल्यास, आगीत भाजल्यास, पाण्यात बुडणे, गरोदर स्त्रिया इ वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये कृपया 108 ह्या नंबरवर कॉल करून तातडीने रुग्णवाहिका बोलावून संबंधितांचे प्राण आपणही वाचवू शकतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गडबडून न जाता सदैव या सेवेचा नंबर लक्षात ठेवून या उपयुक्त सेवेचा वापर करा.

वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये आपल्या मोबाईलवर 108 असा नंबर डायल करावा व फोनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

‘Dial 108’ Ambulance – emergency medical services, Maharashtra details & information.