ब्लड ऑन कॉल : Dial 104

1182
views

ब्लड ऑन कॉल अर्थात जीवनामृतसेवा योजना :
जेव्हा जेव्हा रुग्णाला रक्त किंवा रक्तघटकांच्या संक्रमणाची गरज असते, तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त पेढीचा पत्ता विचारात फिरावे लागते व रक्त व रक्तघटक मिळण्यासाठी अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते.  ह्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने एका दूरध्वनी कॉलवर  शित साखळी पेटी द्वारे जिल्हा रुग्णालया पासून  40 किलोमीटर त्रीज्येतील किंवा एका तासात पोहोचता येईल अशा  शुश्रूषा गृहे  व दवाखान्यापर्यंत रक्त व रक्तघटकांचा मोटारसायकल द्वारे वहन करून पुरवठा उपलब्ध करून देण्याचे करण्याचे ठरविले आहे.

ह्या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • शित साखळी पेटी द्वारे जिल्हा रुग्णालया पासून  40 किलोमीटर त्रीज्येतील किंवा एका तासात पोहोचता येईल अशा शुश्रूषा गृहे  व दवाखान्यापर्यंत रक्त व रक्तघटकांचा मोटारसायकल द्वारे वहन करण्यात येईल.
  • रक्त किंवा रक्तघटकांच्या संक्रमणासाठी 104 हा दूरध्वनी क्रमांक निर्देशित करण्यात आला आहे.
  • शुश्रूषा गृहे / रुग्णालयांना ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी जिल्हा रुग्णालयात करावी लागेल.  .
  • रक्त वहन करण्या मोटारसायकलला निळ्या रंगाचा सुख्रामास असेल व त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देऊन अशा मोटारसायकलना मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.  .

ब्लड ऑन कॉल : Dial 104
महाराष्ट्रासाठी कॉल करा Toll Free Number 104 वर

Search Blood Bank :
http://bloodbanks.mahasbtc.com/bank_details.php


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.