पक्षाघात Stroke

1916
views

पक्षाघात (Stroke) : 
पक्षाघात म्‍हणजे मेंदुच्‍या भागाला अचानक इजा होणे. मेंदुतील रक्‍तनलीकेत रक्‍ताची गाठ तयार होऊन रक्‍तनलीका अवरोध्‍द होऊन मेंदूच्‍या विशिष्ट भागास रक्‍ताचा पुरवठा बंद झाल्‍यामुळे पक्षाघात होतो. तसेच मेंदुमधील रक्‍त वाहिन्‍याचा, रक्‍तस्‍त्राव होऊन सुध्‍दा पक्षाघात होतो. “Atherosclerosis” यात रक्‍तनलिकेतील लवचिकता कमी होत असते. लवचिकता कमी झालेल्‍या भागास Patches of atheroma / Plaques of atheroma असे सुध्दा म्हतणतात. Patches of atheroma यात रक्त‍नलिकेतील आतील भागात लवचिकता कमी झाल्‍याने वसाचे (चरबीचे) थर जमा होतात. त्‍यामुळे मेंदूस तात्‍पुरता रक्‍तपुरवठा कमी होऊन TIA or Transient Ischemic Attack होत असतो. TIA शिघ्र उपचाराने बरा होतो.

पक्षाघातास प्रतिबंध :
पक्षाघात हे उच्‍च रक्‍तदाब नियमीत ठेवल्‍याने, मद्यपान, धुम्रपान, तंबाखु सेवन न केल्‍याने आणि स्‍वस्‍थ जिवनशैलीचा अवलंब केल्‍याने टाळता येतो. त्‍याकरीता खालील प्रमाणे सुचना पाळाव्‍यात

पक्षाघात टाळण्‍यास काहीही सामान्‍उपयुक्‍सुचना  :

 • रक्‍तदाब नियमीत ठेवणे
 • कुटुंबात – रक्‍त संबंधातील व्‍यक्‍तीस पक्षाघाताचा त्रास असल्‍यास इतर कुंटूंबियांनी उच्‍च रक्‍तदाब व मधुमेहासाठी दरवर्षी एकदा तपासणी करुन घेणे.
 • वर्षातून एकदा रक्‍तदाब तपासणे. रक्‍तदाब वाढलेले आढळल्‍यास नियमितपणे रक्‍तदाब तपासणे.
 • सर्व प्रकारचे तंबाखुसेवन व धुम्रपान थांबविणे
 • मद्यपान थांबविणे. मद्यपानामुळे रक्‍तदाब एकाएकी अचानक वाढत असून त्‍यांने पक्षाघात होणे संभवते.
 • नियमित व्‍यायाम करणे.
 • कडधान्‍य फळ व भाज्‍या असलेले संतुलित आहार घेणे.
 • मीठ, मैदा, साखर व अन्‍न पदार्थ जसे बिस्‍कीट, तळलेले पदार्थ टाळणे.
 • मधुमेह असल्‍यास योग्‍य उपचाराने रक्‍तातील शर्करा नियमित ठेवणे.
 • पक्षाघाताची लक्षणे जसे अचानक चेह़रा किंवा हातापायात शिथीलपणा जाणवणे, नजर धुसर होणे, चक्‍कर येणे, तीव्र डोकेदूखी जाणवल्‍यास त्‍वरीत वै्दयकिय उपचार घेणे.

पक्षाघात अधिक धोका केंव्हा संभवतो  :

खालील परिस्‍थीतीत पक्षाघाताचा अधिक धोका संभवतो

 • उच्‍च रक्‍तदाब असणे.
 • हदयरोग असणे.
 • आधी TIA होऊन जाणे.
 • मधुमेह असणे.
 • धुम्रपान व तंबाखु सेवण करणे.
 • स्‍थुलता असणे, नियमित व्‍यायाम न करणे व अधिक स्‍थानबध्‍द जिवनशैली.
 • संततीनियमक गोळयांचा उपयोग .
 • कुंटूंबात रक्‍तसंबंधीयापैकी पक्षाघात व्‍याधी असणे.

उपरोक्‍त व्‍यक्‍तींना पक्षाघाताचा अधिक धोका असल्‍यामुळे त्‍यांनी पक्षाघात टाळण्‍यास उपयुक्‍त सुचनांचा अवलंब करावा.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.