जीवनदायी रुग्णवाहिका : Dial 108

3714
views

महाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प
जीवनदायी रुग्णवाहिका : Dial 108
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखालील तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्पामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची  आरोग्य सेवा ( जीवनदायी रुग्णवाहिका ) देण्यात येते.  त्यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेले रुग्ण, सर्व गंभीर आजार, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशु संबंधातील आजार, साथीचा रोगाचा  झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखिमीमुळे झालेले रुग्ण, गंभीर हृदयरोगी रुग्ण, सर्पदंशाचे रुग्ण, सर्व अपघात, अन्नातून विषबाधा, श्वसनाचे रोग, मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो  .

ठळक वैशिष्ठ्ये :

 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम व महाराष्ट्रा शासन यांचे अंतर्गत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
 • तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी 108 हा दूरध्वनी क्रमांक निर्देशित करण्यात आला आहे.
 • “गोल्डन अवर थियरी “ वर आधारित योजना 108 क्रमांकाद्वारे रुग्णाला पहिल्याच तासात सर्वात जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाईल.   ही सेवा वर्षातील 365 दिवस व 24 x 7 उपलब्ध असेल व रुग्णांना मोफत पुरविण्यात येईल.
 • रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या साथी, गंभीर आजार व तदनुषंगिक समस्या, ह्या तातडीच्या परिस्थिती शिवाय गरोदर स्त्रिया व नवजात बालके यांच्याशी निगडीत तातडीची परिस्थिती सुद्धा हाताळली जाईल.
 • तातडीच्या प्रतिसादात्मक सेवांमध्ये संगणक तंत्रज्ञानाचे एकीकरण, ध्वनी नोंद प्रणाली, भौगोलिक माहिती प्रणाली ( GIS), भौगोलिक स्थिती प्रणाली ( GPS), स्वयंचलित वाहन ठावठिकाणा प्रणाली (AVLT), व फिरती दळणवळण सेवा (MCS), यांचा समावेश असेल.
 • रुग्णावाहीका प्रगत जीवनाधार प्रणाली (ALS)  व प्राथमिक जीवनाधार प्रणाली (BLS) ने सुसज्ज
 • ह्या वैद्यकीय उपकरणांमध्ये रुग्णवाहिकेतील खाट, स्कूप स्ट्रेचर,  रेकॉर्डर  सहित बाय-फेझिक डेफिब्रीलेटर कम कार्डीयाक मॉनिटर, ( फक्त ALS करिता ). ट्रान्स्पोर्ट व्हेंटिलेटर, ( फक्त ALS करिता ), पल्स ऑक्सिमीटर ( फक्त BLS करिता ), सक्शन पंप, प्राणवायूचा सिलिंडर इत्यादीचा समावेश
 • रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी, तातडीचे डॉक्टर, वैद्यकीय नियंत्रण, रुग्णवाहिका डॉक्टर, कर्मचारीवर्ग यांना प्रशिक्षण देण्यात येते.
 • रुग्णवाहिका वैद्यकीय कर्मचारी व प्रशिक्षित चालक असलेल्या आणीबाणीतील वैद्यकीय तंत्रज्ञाकडून परीचालीत
 • तीन पाळ्यांमध्ये 24 x 7 उपलब्ध असणारा Dial 108 रुग्णवाहिका कर्मचारी वर्ग

ध्येय उद्देश :

 • जीव वाचविण्यासाठी प्राथमिक मदत करणे, पुढील नुकसान टाळणे व बरे होण्यासठी मदत करणे,.
 • महाराष्ट्रातील कुठल्याही नेटवर्क मधून तीन अंकी मोफत क्रमांकावर दूरध्वनी करून 24 X 7 उपलब्ध असणारी तातडीची प्रतिसादात्मक सेवा उपलब्ध करून देणे.
 • तातडीच्या परिस्थतीत सर्व गरजूंना  बहुव्यापक सेवेचा लाभ देणारी प्रणाली निर्माण करणे..
 • मृत्यूसंख्येत व रोगटपणा मध्ये 20% घट अपेक्षित .

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.