पांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती

3361
views

Vitiligo in Marathi information. Vitiligo Causes, symptoms, types in Marathi. Vitiligo treatment in Marathi.

पांढरे कोड माहिती :
त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना कोड किंवा पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही कारणांमुळे जर नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते.
पांढरे डाग हे कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतात. अगदी लहान बाळापासून ते वयस्कर व्यक्तींमध्येही हे डाग दिसू शकतात. पण अधिक रुग्ण तरूण वयातील आढळतात.
कोड रोग हा संसर्गजन्य रोग नाही.

पांढरे कोड लक्षणे :
कोडाच्या पांढर्‍या डागांची सुरुवात हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यांपासून होते. या डागांमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही. परंतु प्रखर सूर्यप्रकाशात या डागांमुळे दाह जाणवतो. कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात वा तसेच राहतात. ज्या भागांवर कोड येतात त्या भागांतील केसही पांढरे होतात.

पांढरे कोड होण्याची कारणे :
या विकाराला काही प्रमाणात जेनेटिक दोष कारणीभूत असतात. या विकारात जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणार्‍या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. मेलॅनिनाच्या निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. सुमारे तीस टक्के रुग्णांच्या बाबतीत कोडाचे डाग आनुवांशिक असल्याचे दिसते.
पुन्हा एकदा येथे सांगतो की कोड हे संसर्गाने होत नाहीत. कोड असलेल्या व्यक्तीबरोबर राहिल्याने कोड काही निर्माण होत नाहीत. त्यामुळे पांढरे कोडसंबधी गैरसमज करून घेऊ नका.

पांढरे कोडचे प्रकार :
Vitiligo vulgaris – जर चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला विटीलिगो वलगारीस असं म्हणतात. Lip-tip vitiligo – चट्टे फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगांवर असतील तर त्याला लिप टिप विटीलिगो म्हणतात.
Localised vitiligo – एकाच ठिकाणी आढळणारा चट्टा असेल तर त्याला लोकलाईज्ड विटीलिगो म्हणतात. unstable vitiligo – जर का चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला अनस्टेबल विटीलिगो म्हणतात.

पांढरे कोड आणि मानसिक ताण :
आज सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध उपाय करत असतात. अशा ह्या ‘सेल्फी काढण्याच्या’ आजच्या काळामध्ये आपल्याला कोड झाल्याचा मानसिक ताण त्या व्यक्तीवर अधिक असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचा डाग दिसल्यास अशा व्यक्ती निराश होतात किंवा त्यांना न्यूनगंड येतो.
मात्र अशा व्यक्तींनी विनाकारण ह्या किरकोळ गोष्टीचे दडपण घेऊ नये. हात-पाय धडधाकट नसतानाही किंवा दृष्टिहीन, कर्णबधिर असतानाही जर आपले दिव्यांग बंधू-भगिनी जर संकटांवर मात करून ‘सुंदर’ आयुष्य जगू शकतात तर आपण का नाही..? त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा व मानसिक ताण घेऊ नका.

पांढरे कोड उपचार माहिती :
कोडावर अनेक उपचार आहेत. आज पांढरे कोडवर औषधे गोळ्या, क्रीम्स, अतिनील किरणांद्वारे, लेसर लाईटद्वारे व अनेक शल्यक्रियाही (त्वचारोपण, मिनी पंच ग्राफटिंग, tattooing ई.) उपचार उपलब्ध आहेत ज्याने हे डाग घालवता येतात.
डाग येणे आणि पसरणे थांबवणे हा या उपचारांचा पहिला उद्देश असतो त्यानंतर पांढऱ्या डागांमध्ये पुन्हा रंग आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
जर डाग कमी प्रमाणात असल्यास त्यावर वरून औषधे लावतात आणि बरोबरचं पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबवता येते.

अल्ट्राव्हायोलेट लाईट थेरपी –
यात विशिष्ट अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करून पांढऱ्या डागांतील रंगपेशींनी पुन्हा काम करावे यासाठी उपचार केले जातात. लहान डागांसाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो.
तसेच कोड झालेल्या जागी सोरॅलीन नावाचे औषध लावून सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास किंवा कृत्रिमरीत्या अतिनील प्रकाश पाडल्यास त्वचेचा रोग काही प्रमाणात वा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकतो. या उपचारामुळे कोड झालेल्या जागी मेलॅनोसाइट पेशींची पुन्हा निर्मिती होते.

पांढरे कोड माहिती मराठीतून, कोड उपचार, त्वचारोग मराठी.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :