गर्भाशय कर्करोग – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार

3296
views

स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या प्रमुख विकारांपैकी गर्भाशयाचा कॅन्सर हा एक विकार आहे. सर्व्हिक्स (गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव)च्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. स्त्री जनन अवयवातील गर्भाशय हे एक प्रमुख अवयव आहे. गर्भावस्थेमध्ये भ्रुण हे गर्भाशयातच राहत असते. स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्‍या कॅन्सरच्या यादीमध्ये याचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो.

गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यासाठी 21-55 वयोगटातील महिलांनी दोन ते तीन वर्षातून एकदा तरी आपली तपासणी करून घेणे गरजेचे झाले आहे. हा सामान्यत: धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे, ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही. पण नियमित पॅप टेस्टने त्याचे निदान करता येऊ शकते व वेळीच या दुर्जर आजारापासून बचाव करता येतो.

गर्भाशय कर्करोग होण्याचा धोका कोणाला?विशेषत: मासिकपाळीतील अनियमितता गुप्तांगाची अस्वच्छता, एचपीव्हीचा प्रादुर्भाव अति स्थूलपणा आणि हार्मोन्समधील असंतुलितपणा याला कारणीभूत आहे.

गर्भाशय कॅन्सरची कारणे :

 • एचपीव्ही (पॅपिल्लोमा व्हायरस) बाधित स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो. गर्भाशयाच्या कर्करोगाला मुख्य कारण एचपीव्ही ट्रान्समिशन हे आहे, हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो.
 • हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे – Estrogen स्त्रावाचे अधिक स्त्रवण झाल्याने आणि Progesterone स्त्रावाद्वारे त्याचे नियंत्रण न झाल्याने.
 • अति स्थुलता – लठ्ठपणा हे एक गर्भाशय कॅन्सरचे प्रमुख कारण ठरते. Fat cell मुळे Estrogen स्त्रावाची अधिक निर्मिती होते.
 • मौखिक गर्भनिरोधक गोळ्या (ओसीज) दीर्घकाळासाठी घेतल्या तर सर्व्हिक्सच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. संशोधन सुचवते की, ओसीज घेणा-या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो पण ओसीज घ्यायच्या बंद केल्या की धोका कमी होतो.
 • निसंतती, वंधत्वाची समस्या असणे, संतती संख्या कमी असणाऱ्‍या महिलांमध्ये गर्भाशय कॅन्सरचा धोका अधिक असतो. त्यामानाने अधिक मुले-मुली असणाऱ्‍यांमध्ये गर्भाशय कॅन्सर कमी आढळतो.
 • उशीरा रजोनिवृत्ती झाल्याने – वयाच्या 55 वर्षानंतर ज्या स्त्रीयांमध्ये रजोनिवृत्ती होते, त्यांमध्ये हा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.
 • अनुवंशिकता – गर्भाशयाचा कर्करोग काही कुटुंबांमध्ये अनुवंशिक असू शकतो. जर स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशयाचा कर्करोग असेल तर कुटुंबामध्ये कुणालाही कर्करोग नसणा-या स्त्रीपेक्षा या स्त्रीमध्ये रोग होण्याची शक्यता 2 ते 3 पट जास्त असते.
 • स्तनांचा कर्करोग किंवा Ovaries कॅन्सर असल्यास गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.

गर्भाशय कॅन्सरची लक्षणे :
हा सामान्यत: धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे, ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही, पण सर्वाधिक सामाईक लक्षण म्हणजे योनीमार्गातून अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे पण काही केसेसमध्ये प्रगत टप्प्यांपर्यंत कर्करोग होईपर्यंत कदाचित सुस्पष्ट अशी कोणतीच लक्षणे दिसून येणार नाहीत. नंतर तुम्हाला कदाचित ओटीपोटाच्या वेदना किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

खालील लक्षणे जाणवू शकतात :

 • योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे.
 • गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
 • रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
 • ओटीपोटात वेदना होणे यासारखी लक्षणे जाणवतात.

गर्भाशय कॅन्सरचे निदान कसे कले जाते :
कोणत्याही कॅन्सरमध्ये निदानाचे अत्यंत महत्व आहे. निदानामुळे कॅन्सरच्या अवस्थेचे अचुक ज्ञान होते. यामुळे उपचाराची योग्य दिशा मिळण्यास मदत होते.

तपासण्या व लॅब टेस्ट :
पॅप स्मिअर आणि ओटीपोटाच्या तपासणी करून गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करता येते.

Pap smear किंवा Pap test – पॅप टेस्ट ही एक प्रकिया आहे, ज्यामध्ये सर्व्हिक्सपासून पेशीचा एक भाग काढला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला जातो. यामध्ये सर्व्हिक्स मधून पेशी गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. गर्भाशयाच्या पेशीमध्ये झालेले अस्वाभाविक बदल यामुळे दिसून येतात. आणि भविष्यात गर्भाशय कर्करोग होण्याची शक्यता आहे की नाही हे कळण्यास यामुळे मदत होते. गर्भाशय कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी पॅप टेस्ट नियमित करणे गरजेचे आहे.

कोणी व कधी करावी पॅप टेस्ट :
वयाच्या 21-65 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने 3 वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.

 

हे करा..

 • वजन आटोक्यात ठेवावे,
 • चरबीयुक्त, स्नेहयुक्त अधिक आहार सेवन करणे टाळावे,
 • उच्चरक्तदाब, मधुमेहासारखे विकार असल्यास त्यांवर उपचार घ्यावा,
 • गर्भाशय कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी पॅप टेस्ट नियमित करणे गरजेचे आहे,
  वयाच्या 21-65 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने 3 वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे,
 • रजोनिवृत्तीनंतर जर विकृत्तीजन्य योनीस्त्राव येत असल्यास तात्काळ स्त्री-रोग तज्ञांशी संपर्क साधावा,
 • कुटुंबातील आई, बहिण यांमध्ये जर गर्भाशय कॅन्सरची लक्षणे उद्भवल्यास स्वतःसुद्धा गर्भाशय कॅन्सरचे निदान करुन घ्यावे, यासारख्या उपायांद्वारे निश्चितच असाध्य अशा गर्भाशय कॅन्सरपासून दुर राहता येते.

गर्भाशय कर्करोग आणि उपचार :
उपचार पद्धतींमध्ये सर्जरी (लोकल छेदनासहित) लवकरच्या टप्प्यामध्ये आणि केमोथेरपी आणि/किंवा रेडिओथेरेपी रोगाच्या सर्वाधिक प्रगत टप्प्यांमध्ये यांचा समावेश आहे. यामध्ये कदाचित सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी किंवा यांच्या एकत्रिकरणाचा समावेश असू शकतो. उपचार पद्धती रोगाच्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते.प्रतिक्रिया द्या :