गुणकारी ऊस व ऊसाचा रस

4604
views

Sugarcane juice health benefits in Marathi.

आयर्वेदात औषधी गवतांची जी पाच श्रेष्ठ तृणमुळे सांगितलेली आहेत त्यामध्ये ऊसाच्या मुळांचा समावेश केला आहे. ही तृणपंचमुळे थंड गुणाची, बलकारक, किडनीच्या विकारांवर उपयुक्त अशी आहेत.

गुणकारी ऊस व ऊसाचा रस :
• ऊस हा पित्तशामक आहे.
• ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो. ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो.
• मूतखडा वगैरे लघवीच्या संदर्भातले सगळे विकार ऊस दूर करतो.
• शरीरातील सर्व विषाक्त पदार्थ धुतले जातात.
• कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते.
• ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :