तोंड येणे : कारणे, लक्षणे आणि उपचार


तोंड येणे म्हणजे काय..
तोंड येणे या विकाराला स्टोमोटायटिस किंवा माऊथ अल्सर असेही म्हटले जाते. यामध्ये तोंडाच्या आतल्या भागाला प्रामुख्याने ओठ, जीभ, टाळा यांना सूज आलेली असते. काही वेळा तोंडाच्या आतली त्वचा सोलल्यासारखी होते. जीभ आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट पदार्थ जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही.

तोंड येण्याची कारणे :

 • ब12 जीवनसत्व आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव हे प्रमुख कारण आहे
  याशिवाय
 • अति प्रमाणात मसालेदार, तिखट, तेलकट खाणे,
 • अति प्रमाणात चहा, कॉफी पिण्याची सवय यांमुळे,
 • धूम्रपान, तंबाखूचे सेवन,
 • पोटाच्या तक्रारी,पोट साफ न होण्यामुळे,
 • तोंडाच्या अस्वच्छतेमुळे होणारे इन्फेक्शन झाल्याने, दातांचे विकार असल्यास किंवा दात वारंवार लागूनही तोंडात जखम होऊन तोंड येण्याचा त्रास होतो.
 • काही विशिष्ट औषधांमुळे हा त्रास होऊ शकतो.

हे करा :

 • वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल, तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार उपचार करणे आवश्यक ठरते.
 • ब12 जीवनसत्व आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव यामुळे तोंड आले असल्यास आपले डॉक्टर मल्टी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लीमेंट्स देऊ शकतात.
 • आहारात थंड दूध हळद घालून प्यावे, तूप, नारळाचे पाणी, तोंडलीची भाजी असे पदार्थ घ्यावेत.
 • पोटाच्या तक्रारी,पोट साफ न होण्यामुळे तोंड येत असल्यास यासाठी तंतुमय पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करावा.
 • अति तिखट, मसालेदार, तेलकट जेवण टाळावे.
 • काही विशिष्ट औषधांमुळे हा त्रास होत असेल, तर आपल्या डॉक्टरांना त्याची कल्पना द्या.
 • तोंडाची नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता ठेवा.
 • अतिप्रमाणात चहा पिणे टाळा.
 • तंबाखू, धूम्रपान इ. व्यसन टाळा.

Stomatitis Marathi information


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :