पोटाच्या कैन्सरविषयी जाणून घ्या

37
views

पोटाच्या कैन्सरची सामान्य माहीती :
पोटाचा कैन्सर होण्याचे प्रमाण ‘A’ रक्तगटाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आढळते.
वयाचा विचार केल्यास वयाच्या 40शी नंतर हा कैन्सर अधिक होण्याची शक्यता असते.
तर स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.पोटाच्या कैन्सरचे ठिकाण हे पोटाच्या पायलोरस आणि हृद्याजवळील भागामध्ये अधिक आढळते. तर कधिकधी पोटाच्या फंडस भागातही आढळतो.

पोटाच्या कर्करोगाची कारणे –
वयस्क पुरुषांमध्ये, ‘A’ रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आहे.
जुनाट पेप्टिक अल्सर, Pernicious anemia (रक्ताल्पता) या रोगांच्या उपद्रवातून पोटाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.
धुम्रपान आणि मद्यपान करणाऱयांमध्ये पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

अन्य सहाय्यक कारणे –
◦ अनुवंशिक कारकांमुळे,
◦ पोटातील आमाशय रसाच्या (Stomach acid) कमतरतेमुळे,
◦ आहारातील तंतुमय पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांच्या कमतरतेमुळे,
◦ पोटाचा जीर्ण क्षोभ झाल्याने, मुख्यतः अत्यधिक मद्यपान, अतिगरम, तीक्ष्ण पदार्थांच्या सेवनाने पोटाचा क्षोभ (Irritation) होतो.
◦ भोजनासंबंधी अनियमितता, आहार वेळेवर न घेण्याच्या सवयीमुळे,
◦ अधिक मद्यपान, तंबाखू, सिगारेट यांच्या व्यसनांमुळे,
◦ अतिखारट पदार्थ, अतितिखट, मसालेदार, पित्तवर्धक आहाराच्या अधिक सेवनाने पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

कर्करोगाचा प्रसार –
पोटाच्या कैन्सरची शरीरात सुरवात हळूहळू होते. त्याचवेळीच म्हणजे कैन्सरच्या प्रारंभिक अवस्थेमध्येच त्याचे निदान करुन, वेळीच कैन्सरचा अटकाव करणे आवश्यक असते. अन्यथा पोटाचा कैन्सर गंभीर बनून संपुर्ण पोटाला बाधीत करतो.
याशिवाय रक्ताद्वारे हा कैन्सर यकृत, फुफ्फुसे, मेंदु, किडन्या आणि हाडांमध्ये पसरतो.
यासाठी सुरवातीच्या अवस्थेमध्येच कैन्सर असताना त्याचे निदान करुन योग्य उपचारांद्वारे त्यापासुन रक्षण करणे आवश्यक असते.प्रतिक्रिया द्या :