बाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे

5538
views

बाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे :

 • गरोदरपणात आनिमिया, अशक्तपणा असेल तर
 • आधीचे बाळंतपण सुरक्षित झाले नसेल तर
 • डिलीव्हरी आधी रक्तस्त्राव व्हायला लागला तर
 • अचानक कळा बंद झाल्यावर
 • नाडीचा वेग वाढला तर
 • हाता-पायावर, चेहऱ्यावर सूज येत असेल तर
  विश्रांती घेताना सुद्धा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर
 • आकडी येणे, नीट न दिसणे, उलटया, गंभीर स्वरुपाची डोकेदुखी
 • डिलीव्हरीच्या कळा 12-24 तासांपेक्षा जास्त वेळ येत असतील तर त्यामुळे बाळ आत गुदमरू शकते.
 • डिलीव्हरीनंतर वार जर पूर्णपणे बाहेर आली नाही तर वार आत राहिली तरी जंतूसंसर्ग होऊ शकतो.
 • बाळंतपणानंतर न थांबणारा रक्तस्त्राव झाला, बाळंतपणानंतर सतत ताप असेल, अति उच्च रक्तदाब इ.

बाळंतपणाच्यावेळी कळा सुरु झाल्यावर वैद्यकीय मदतीची गरज केव्हा लागते..?
अंगात जास्त ताप असणे, बेशुद्ध पडणे किंवा आकडी येणे, वर बाहेर पडण्यापूर्वी रक्तस्त्राव होणे, बाळंतपणाचा काळ 12 तासापेक्षा अधिक लांबणे. अशावेळी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काहीवेळा वरीलप्रमाणे त्रास होऊ शकतो.प्रतिक्रिया द्या :