आमवात (रुमेटाइड आर्थराइटिस) : कारणे, लक्षणे आणि उपचार

7766
views

Rheumatoid arthritis in Marathi,
amavata treatment in marathi, amavata in marathi.

रुमेटाइड आर्थराइटिस किंवा आमवात म्हणजे काय..?
रुमेटाइड आर्थराइटिस हा विकार सांध्यांना जखडून ठेवतो हा आजार ‘आमवात’ ह्या नावानेही ओळखला जातो.
बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, लठ्ठपणा यामुळे 40 ते 60 वयोगटातील महिला व पुरुषांना रुमेटाइड आर्थराइटिसची (आमवाताची) समस्या भेडसावू लागली आहे. पूर्वी साठीनंतर ही समस्या दिसून येत असे, परंतु आता तरुण वयातच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

रुमेटाइड आर्थराइटिस हा दीर्घकाळ चालणारा एक गंभीर आजार असून या आजारात सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते, यामुळे सांध्याची हालचाली कमी होतात. रुमेटाइड आर्थराइटिसमुळे शरीराच्या कोणत्याही सांध्यावर परिणाम होऊ शकतो, तरीही प्रामुख्याने हात आणि पाय यांच्या सांध्यामध्ये अधिक परिणाम दिसतो. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. पण साधारणपणे 40-60 वयाच्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे.

रुमेटाइड आर्थराइटिस लक्षणे :
प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणे वेगवेगळी असू शकतात.
• सांधे जखडणे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सांध्यामध्ये आखडल्यासारखं वाटते. ही प्रक्रिया सुमारे एक ते दोन तास टिकते. 
• ‎सांध्यांमध्ये वेदना होणे, सूज येणे, सांध्यात पाणी साचणे,
• ‎सांध्यांची हालचाल मंदावणे.
• ‎हाता पायाला मुंग्या येणे, सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे.
• ‎प्रभावित जॉईंटजवळ कडक भाग तयार होणे, त्याठिकाणी लालसरपणा असतो.
• ‎अशक्तपणा, अनेमिया (रक्ताल्पता).
• ‎ताप येणे, वजन कमी होणे, भुक कमी होते ही लक्षणे दिसू शकतात.
आयुर्वेदानुसार आमवातात असणारी संधीवेदना व संधीसूज यामध्ये संचारित्व असते. आम हा शरीरात संचार करताना ज्या संधीच्या ठिकाणी जाऊन पोहचतो त्याठिकाणी सूज, वेदना दिसतात.

रुमेटाइड आर्थराइटिसची कारणे :
हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. बिघडलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे ज्या व्याधी होतात त्यांना ‘ऑटो-इम्यून डिसीजेस’ म्हणतात व हृमॅटॉइड आर्थ्रायटीस हा त्यापैकीच एक. म्हणूनच ही व्याधी फक्त उतारवयातच न होता, तरुणाईत किंवा लहानमुलांमध्ये देखील आढळतो.
• अचानकपणे विपरीत झालेली रोगप्रतिकारशक्तीमुळे हा आजार होतो.
• ‎याशिवाय अनुवंशिकता, जेनेटिक फॅक्टर आणि हार्मोनल चेंजेसदेखील या आजारासाठी कारणीभूत ठरतात.
• ‎धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, थायरॉईड पेशंट यांमध्ये हा विकार होण्याचा धोका अधिक असतो.

आमवाताचे उपद्रव :
रोगाकडे बरेच दिवस दुर्लक्ष केल्यास..
• सांध्यांच्या आतील भागातील सूज असल्यामुळे सांध्यांची गादी (कार्टीलेज) आणि हाडे या दोन्हीचे नुकसान होऊ शकते. परिणामी, हाडांचा आकार विकृत होऊ शकतो.
• ‎सांध्याच्या हालचाली कमी किंवा बंद होऊ शकतात.
• ‎फुफ्फुसाला आणि हृदयाजवळील रक्तवाहिन्यांभोवती सूज येऊ शकते.
• ‎अनेमिया (रक्ताची कमतरता होणे) हा विकार होऊ शकतो.
• ‎रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींमध्ये घट झाल्यास, प्लीहाचा आकार (रक्त शुद्ध करण्यासाठी काम करते) मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

आमवाताचे निदान आणि तपासणी :
रक्त तपासणी – यामध्ये रक्त चाचणीद्वारे RA factor, ESR, CRP, blood count, ANA आणि यूरिक ऍसिड इ. चे प्रमाण तपासले जाते. याशिवाय काहीवेळेस सायनोव्हिअल फ्लुईडची तपासणी, एक्स-रे आणि एमआरआय तपासणीही केली जाते.

आरए टेस्ट – ही रुमॅरॉइड आर्थ्रायटिसची मुख्य तपासणी असून ही सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये पॉझिटिव येते.

सी रिअॅक्टिव प्रोटिन्स (CRP) – सी रिअॅक्टिव प्रोटिन्सची पातळी रोग नियंत्रणाखाली आहे का नाही हे ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. रोग वाढू लागल्यास सी रिअॅक्टिव प्रोटिन्सची पातळीसुद्धा वाढते.

आमवात उपचार :
आधुनिक उपचारांमध्ये वेदनाशामक सूज कमी करणारी औषधे दिली जातील. इम्यूनसिस्टीमचे कार्य सुधारण्यासाठी औषधे दिली जातील. प्रभावित सांध्याचे कार्य पूर्वरत करण्यासाठी आर्थोप्लास्टी किंवा जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते.
याशिवाय Stretching व्यायाम आणि फिजिओथेरपीचा ही उपचारात अंतर्भाव केला जातो.

आयुर्वेदात आमवातावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. एरंडस्नेह, सिंहनाद गुग्गुळ यासारखी अनेक औषधे प्रभावी ठरतात. यासाठी आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार करून घ्यावेत.
अनेक लोक संधीवेदना व संधी सुजलेले असता, बाहेरून बाजारांत मिळणारी कुठलीही तेले आणून लावतात. असे न करता, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आमवात आहे की संधिवात आहे याचे योग्य निदान करून त्यांच्याकडून उपचार करून घ्यावेत.

हे करा..
• बैठ्या जीवनशैलीपासून दूर राहा नियमित व्यायाम आणि योगासने करा.
• ‎वजन आटोक्यात ठेवा.
• ‎योग्य व संतुलित आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, कॅल्शियम, ओमेगा-3 फैटी एसिड आणि लोहयुक्त आहार घ्यावा.
• ‎एरंडेल तेलाचा आहारात समावेश करावा. चपातीकरिता कणीक कालविताना, एका चपातीकरिता एक चमचा एरंडेल तेल मोहन म्हणून वापरावे किंवा गरम भाकरीवर एक चमचा एरंडेल तेल लावून ती भाकरीही खाऊ शकता.
• ‎सूज कमी करण्यासाठी आले, हळद घालून गवती चहा प्यावा.
• ‎जेवताना व इतरवेळीही गरम पाणी प्यावे.
• ‎पंख्याचा वारा, एसी, कोल्ड्रिंक पिणे, गार पाणी पिणे टाळा.
• ‎धूम्रपान (Smoking) सारखी व्यसने टाळा.

– Dr. Satish Upalkar

आमवात मराठी, आमवात घरगुती उपाय, आमवात मराठी माहिती, आमवात आहार, आमवात म्हणजे काय, आमवाताची कारणे, आमवात आणि उपाय, आमवात निदान, आमवात लक्षणे, आमवात आणि संधिवात फरक, आमवात औषध, आमवात आयुर्वेद उपचार मराठीत, आमवात लक्षणे मराठी, आमवात चिकित्सा, rheumatoid meaning in marathi, arthritis treatment in marathi, osteoarthritis in marathi, arthritis information in marathi, sandhivata treatment in marathi, rheumatism meaning in marathi, vaat rog in marathi, rheumatic fever meaning in marathi, amavata treatment in marathi
amavata lakshane marathi, amavata diet in marathi, amavata treatment in marathi, amavata in marathi, amavata home remedies marathi, amavata symptoms marathi, amavata causes marathi.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :