जीवनदायी आरोग्य योजना

2828
views

Rajiv Gandhi Jeevandayi Arogya Yojana

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
योजने बद्दल माहिती –
दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील (पांढरी शिधा पत्रिका धारक वगळता) अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या करीता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांच्यातर्फे ही योजना राबवली जात आहे.
ही योजना 2016 पासून महात्मा फुले जीवनदायी योजना ह्या नावाने ओळखली जाते.

योजनेचा उद्देश :
राज्यातील दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करणे.

योजनेस पात्र कोण..?
वार्षिक उत्पन्न रु 1 लाखापर्यंत शिधापत्रक धारक असलेल्या कुटुंबांना लागू आहे.
खालील अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
1) पिवळी शिधा पत्रिका धारक कुटुंब
2) अंत्योदय अन्न योजना कार्ड
3) अन्नपूर्णा कार्ड
दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे योजनेस पात्र रहातील. (मात्र शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून)

आवश्यक कागदपत्रे :
लाभार्थ्यांची ओळख राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा राज्य शासन ‍निर्धारीत करील अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे तसेच सदर ओळखपत्र मिळेपर्यंत योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांकडे असलेली वैध शिधापत्रिका व केंद्र/राज्य शासनाने वितरीत केलेले कोणतेही एक ओळखपत्र (छायाचित्रासह) उदा. आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना इ. आणि औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा अशा एकुण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकरी कुटुंबांसाठी त्यांच्याकडे असलेली शुभ्र शिधापत्रिका अथवा 7/12 उताऱ्याच्या आधारे योजनेंतर्गत उपचार अनुज्ञेय आहेत.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

कोणकोणत्या रोगांवरील उपचारासाठी लाभ घेता येईल..?
यात हृदयरोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण, मेंदू, कर्करोग व मणक्याचे आजार समाविष्ट केले आहेत.
या योजने अंतर्गत 972 शस्त्रक्रिया तसेच औषधोपचार, 121 फेरतापासणी उपचारांचा आणि 30 विशेषज्ञ सेवांचा लाभ घेता येईल.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पध्दतींवरील उपचारासाठी कुटुबांतील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष/प्रतिकुटुंब रु.1.50 लाख एवढी आहे.
मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रति वर्ष/प्रति कुटुंब रु.2.50 लाख आहे.

अर्ज करण्याची पद्धत :
योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्रामार्फत रुग्णास अर्ज करता येतो.

अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
रुग्ण भरती झाल्यापासुन तात्काळ किंवा त्या दिवशी 12 ते 24 तासात.
विमा कंपनी सर्व दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करून नियोजित दरपत्रकानुसार पेकेज प्रमाणे मान्यता राशी ग्राह्य करेल आणि रुग्णाचा उपचार खर्च इलेक्ट्रोनिक ट्रान्स्फरने हॉस्पिटलच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
फोन नंबर – 1800-233-2200
वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/MJPJAY/Marathi_index.jsp


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.