प्रथिनयुक्त पदार्थ

940
views

Proteins general info in Marathi [प्रथिने] –
प्रथिनयुक्त पदार्थ –
शरीराला प्रथिने ही वानस्पतिक आणि प्राणिज अशा दोन्ही आहार घटकातून मिळतात.
◦ वानस्पतिक – द्विदल धान्ये जसे सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबीन, शेंगदाने, काजु इ.
◦ प्राणिज – दुध, अंडी, मांस, मासे, मांसाहार.

प्रथिनांचे कार्य –
◦ शरीराची झीज भरुन काढण्याचे महत्वपुर्ण कार्य प्रथिनांद्वारेच केले जाते.
◦ प्रथिनातून शरीराला उर्जा, उष्मांक मिळतो. ती उर्जा कार्य करण्यास उपयोगी पडते.
◦ प्रथिनांद्वारे रक्तातील विविध प्रथिनांची निर्मिती करतात. जसे Albumin, globulin, pro-thrombin इ.
◦ रोगप्रतिकारक क्षमता प्रथिनांमुळे निर्माण होते.
◦ विविध पाचकस्त्राव, हॉर्मोन्सची निर्मिती करणे.
◦ शरीराची वाढ करणे यासारखी कार्ये प्रथिनांद्वारे केली जातात.

दैनंदिन गरज –
◦ पुरुषांना दररोज 60 ग्रॅम तर स्त्रीला दररोज 55 ग्रॅम प्रथिनांची गरज असते.
◦ गर्भावस्था आणि स्तनपान काळामध्ये स्त्रियांना 70 ते 75 ग्रॅम प्रथिनांची दररोज गरज असते.
◦ अतिरिक्त प्रमाणातील प्रथिने शरीरात चरबीच्या स्वरुपात साठवली जातात. यासाठी पुरेशा योग्य प्रमाणातच प्रथिनांचे सेवन करावे.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :