हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट टिप्स

5735
views

हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट टिप्स :
हार्ट अटॅकचे स्वरुप आज अंत्यंत चिंताजनक बनले आहे. कारण पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा हृद्यविकार आज 25 ते 30 वयापुर्वीच युवकांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. बदललेली जीवनशैली, शारिरीक श्रमाचा अभाव, मानसिक तानतणाव या प्रमुख कारणांमुळे हृद्यासंबंधी विकारांचे प्रमाण वाढत आहे. परीणामी अकाली मृत्युचेही प्रमाण वाढत आहे.

यासाठी प्रत्येकाने आपल्या हृद्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. यासाठी योग्य आहार- विहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे, वजन आटोक्यात ठेवणे, वेळोवेळी हृद्यसंबंधी तपासणी करुन घेणे आणि हृद्याशी संबंधीत सामान्य समस्याविषयी जागरुक असणे गरजेचे आहे.

हे लक्षात ठेवा..
◦ ब्लड प्रेशरची नियमित तपासणी करा.
◦ कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष ठेवा.
◦ मधुमेह असल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
◦ आपल्या आहाराचे, विहाराचे, व्यायामाचे आणि वजनाचे मुल्यांकन करा.
◦ परिवारामध्ये (उदा. आई, वडील, आजी, अजोबा, बहिण, भाऊ) यांमध्ये जर हार्ट अटॅकसंबंधी समस्या आहेत का पहा. कारण अनुवंशिक कारकांमुळे आपणासही हृद्य विकार होण्याची अधिक शक्यता असते.
◦ धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हार्ट अटॅकचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी हृद्याच्या आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.

धोके ओळखा..
◦ कोणत्याही व्यक्तीमध्ये जर मधुमेह, उच्च रक्तदाब समस्या, उच्च कोलेस्ट्रॉल, स्थूलता यासारख्या समस्या असल्यास हार्ट अटॅक येण्याचा अधिक धोका असतो.
◦ गुड कोलेस्ट्रॉल 50 पेक्षा कमी असणे धोक्याचे असते.
◦ बॅड (वाईट) कोलेस्ट्रॉल 100 पेक्षा अधिक असणे धोक्याचे असते.
◦ तर ब्लड प्रेशर 130/85 mm/Hg पेक्षा अधिक असणे धोक्याचे असते.
◦ धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हृद्यविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो.

हार्ट अटॅक आपत्कालिन व्यवस्था –
◦ तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा,
◦ रुग्णवाहिका (ऐम्बुलैंस) बोलवावी,
◦ हार्ट अटॅकशी संबधीत लक्षणे जाणवल्यास रुग्णास एस्प्रिनची गोळी द्यावी. मात्र एस्प्रिनची एलर्जी असणाऱया रुग्णास एस्प्रिन देऊ नये.प्रतिक्रिया द्या :