ऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता)

27
views

ऑस्टिओपोरोसिस :
ऑस्टियो म्हणजे हाड आणि ऑस्टियोपोरोसिस म्हणजे ठिसुळ झालेले हाड. वय वाढेल तसे हाडांच्या पातळ होत जाणार्‍या क्रियेला ऑस्टियोपोरोसिस म्हटले जाते. ऑस्टिओपोरोसिस हा तसा सर्वसामान्यपणे कोणालाही होणारा आजार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कित्येक जणांना या आजाराला सामोरं जावं लागतं. यामध्ये हाडे कमकुवत व नाजुक होत जातात, इतकी की एक हलकासा धक्काही त्यांना तोडु शकतो. अगदी लहानशा मुरगळण्यामुळे किंवा जड वस्तू उचलल्यामुळेदेखील हे फ्रॅक्चर होऊ शकतं. बालवयातच आपल्या हाडांची वाढ होते. तर तरुण पणात ही हाडांची घनता वाढून ती कणखर बनतात. वय जसे वाढत जाते तसे शरीराची झीज होत जाते. तसेच आपल्या हाडांचेही असते, आपण योग्य ती काळजी न घेतल्यास वयाच्या तिशीनंतर हळूहळू प्रामुख्याने हाडांची घनता कमी होण्याचं प्रमाण अधिक वाढतं आणि ऑस्टियोपोरोसिसचा विकार उद्भवतो.

कसे ओळखाल..?
हा आजार कित्येक वर्ष आपल्या शरीरात लपून बसलेला असतो. अनेकांना हे माहित ही नसते की त्यांना ऑस्टियोपोरोसिस आहे. मात्र दडून बसलेला हा आजार हळूहळू आपल्या हाडांना क्षती करत राहतो. यात जोपर्यंत पहिले फॅक्चर होत नाही तोपर्यंत ऑस्टियोपोरोसिस असल्याचे लक्षातचं येत नाही. त्यामुळे या आजाराला ‘सायलंट किलर’ असेहीे म्हंटले जाते. वॄध्दावस्थेमध्ये मणका, मणगट किंवा कमरेतील हाडांचे फॅक्चर ऑस्टियोपोरोसिस मुळे होऊ शकते.

ऑस्टियोपोरोसिसची लक्षणे :

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

 • कंबर, हात व मणगटाच्या हाडांमध्ये वेदना असणे,
 • मानेमध्ये वेदना, पाठीच्या खालच्या बाजुला वेदना,
 • उंची कमी होणे व बाक येणे,
 • कंबर, मणका व मनगटामध्ये फॅक्चर
 • बहुतांशवेळा न पडता-झडता होणे,
  हाडे कमकुवत व नाजुक होतात,
  लहानशा मुरगळण्यामुळे किंवा जड वस्तू उचलल्यामुळेदेखील हे फ्रॅक्चर होऊ शकतं.

धोका कुणाला..?
स्त्रीयांमध्ये ऑस्टियोपोरोसिसशी संबधातील फॅक्चर होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा चार पट अधिक आहे. स्त्रीयांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आढळतं. कारण स्त्रीयांना 50 वर्षानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर हा त्रास उद्भवण्याचा धोका अधिक असतो. तीनपैकी एका स्त्रीला आणि आठपैकी एक पुरुषाला हा आजार झालेला दिसून येतो.
पुरुषामध्ये 60 ते 70 वर्षे वयानंतर हाडांची झीज जोराने होते. भारतात जवळपास 65 दशलक्ष लोक ऑस्टियोपोरोसिस विकाराने पिडीत आहेत.

ऑस्टियोपोरोसिसची कारणे :

 • अनुवंशिक कारणामुळे, कुटुंबामध्ये कुणाला ऑस्टियोपोरोसिस झालेला असणे,
 • आहारात कॅल्शीयमची कमतरता असणे,
  अयोग्य आहारामुळे जसे जंकफूड-फास्टफूड आणि मैद्याचे पदार्थांचे अधिक सेवन करणे,
 • शारिरीक व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभावामुळे,
 • ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता,
 • मद्यपान, धुम्रपान व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन,
 • हाडांचा कर्करोगामुळे,
 • कॉर्टिको स्टेरॉयडस, मुत्रल औषध तसेच रक्तदाबावरील औषधांचे सेवनामुळे,
 • वयानुसार लवकर रजोनिवॄत्ती येण्यामुळे तसेचं ज्या स्त्रीयांचे बीजग्रंथी शस्त्रक्रियेने काढ्लेले आहेत अशा स्त्रियांमध्ये ऑस्टियोपोरोसिस होण्याची अधिक शक्यता असते.

ऑस्टियोपोरोसिसचे निदान :
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आज अनेक आजारांचे निदान वेळेत होऊ शकते. ज्या प्रमाणे हाडांचे फॅक्चर एक्सरेने ओळखले जाऊ शकते, तसेच हाडांची ठिसुळता व पुढे फॅक्चर होण्याची संभावना आज ओळखता येते.
– डेक्झा स्कॅन
– बोन डेन्सिटोमेट्री चाचणी
– ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे असा भाग उदाहरणार्थ मणका किंवा पार्श्वभागाचा एक्सरे
– सिरम कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, तसंच टी३, टी४ टीएसएच, एस इस्ट्रोजन, टेस्टोटेरॉन यांसारख्या काही रक्तचाचण्यांद्वारेदेखील हा आजार झाल्याचं कळू शकतं.

आधुनिक डेक्झा स्कॅन –
हाडांची ठिसुळता अचुकपणे दर्शविणारे अत्याधुनिक डेक्झा स्कॅन द्वारे हाडांची खनिज घनता मोजली जाते. डेक्झा स्कॅन हे तंत्रज्ञान सुरक्षित, जलद, अचुक, वेदनारहित असुन ऑस्टियोपोरोसिसच्या निदानाकरिता अत्यंत उपयुक्त आहे. हाडांची खनिज घनता मोजण्यासाठी अन्य कोणत्याही पध्दतीपेक्षा हे तंत्रज्ञान सर्वोत्तम आहे. ह्याचा रिपोर्ट संगणकाद्वारे पुर्णपणे इमेज व ग्राफिकद्वारे दर्शविला जातो. यामध्ये फक्त हाडांची घनताच नव्हे तर शरिरातील चरबी व मांसपेशीचे प्रमाणही दर्शविले जाते. हाडांची ठिसुळता फार आधीच जाणुन घेऊन पुढील दहा वर्षापर्यंत होऊ शकणार्‍या संभाव्य फॅक्चरचे अनुमान केले जाते. याच्या माहितीवरुन डॉक्टरांना तुमचे कोणते हाड ठिसुळ झाले आहे व ऑस्टियोपोरोटिक फॅक्चर कुठे होऊ शकते हे वर्तविता येते.

ऑस्टियोपोरोसिस पासुन कसे वाचाल..?

 • हाडांच्या विकासासाठी आणि आयुष्यभर त्यांना बळकट राखण्यासाठी परिपुर्ण कॅल्शीयम व विटामीन-डी चे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • योग्य आहार घ्या – कॅल्शीयम मिळण्याचे चांगले घटक जसे, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, बदाम, समुद्री मासे, अंडी, यकृत, तीळ, मेथीचे दाणे, पालक, नाचणी अशा पदार्थाचा आहारात समावेश करावा.
 • विटामीन-डी ची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज सकाळचे कोवळे उन्हामध्ये शेक घ्या.
 • नियमित व्यायाम आणि योगासने करणे आवश्यक.
 • दररोज किमान अर्धा तास पायी चालण्यामुळे हाडे कमजोर होण्यापासुन वाचु शकतात.
 • पायऱ्या चढण्यां-उतरण्याचा व्यायाम केल्यास अधिक उपयुक्त.
 • ऑस्टियोपोरोसिस झालेल्या लोकांनी वजनदार व्यायाम प्रकार करु नयेत.
 • कॅल्शीयमच्या रक्षणासाठी मद्यपान, अतीमांसाहार, धुम्रपान करणे टाळा.

सर्वसाधारण महिलांच्या शरीराला 1000 मिलिग्रॅम कॅल्शिअमची दिवसाला गरज असते. मात्र आपल्याकडच्या चुकीच्या आहारपद्धतीमुळे ती केवळ 300 ते 500 मिलिग्रॅम इतकीच मिळते. ही कमतरता भरून काढण्यासाठी दररोज दीड कप दूध किंवा दही यांचा आहारात समावेश करावा.प्रतिक्रिया द्या :