लठ्ठपणा होऊ नये म्हणून करावयाचे उपाय


लठ्ठपणा होऊ नये म्हणून करावयाचे उपाय :
◦ नियमित व्यायाम, योगासने करावित,
◦ शारीरीकदृष्ट्या क्रियाशील रहावे,
◦ गोड, अतितेलकट, कफवर्धक आहारावर नियंत्रण ठेवावे.

स्थुलतेसाठी व्यायाम –
दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा. आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवसतरी व्यायाम करणे आवश्यक. व्यायाम सुरु करताना सुरवातीस कमी प्रमाणात करुन दररोज थोडा-थोडा व्यायाम वाढवत जावा. एकाच दिवशी जास्त प्रमाणात व्यायाम करु नये.

खालील व्यायामांचा अंतर्भाव करावा –
पळण्याचा व्यायाम – 30 मिनिटामध्ये 2 मैल पळावे,
पोहण्याचा व्यायाम – 30 मिनिटे करावा,
सायकल मारण्याचा व्यायाम – 30 मिनिटामध्ये 5 मैल सायकल मारण्याचा व्यायाम करावा.

स्थुलतेसाठी आहार –
हिरव्या पालेभाज्या, तंतुमय पदार्थांनी युक्त आहार घ्यावा,
लो कॅलरीज आहार घ्यावा,
तेलकट पदार्थ, तुपाचे पदार्थ, गोड पदार्थ, मिठाई, बेकरी पदार्थ, शीतपेये, जंकफूड, फास्टफूड यांचे सेवन करु नये.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :