लठ्ठपणा विषयी जाणून घ्या

1998
views

स्थुलता :
बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहाराच्या अतिरेकामुळे आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या भेडसावत आहे.
शरीरातील चरबी आणि मांस धातुची अतिप्रमाणात वाढ होणे, वजन अतिप्रमाणात वाढणे म्हणजे स्थुलता.

स्थुलतेमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम –
खालील विकार उद्भवण्यासाठी स्थुलता हे सहाय्यक कारण ठरत असते.
◦ विविध हृद्यविकार,
◦ उच्च रक्तदाब,
◦ टाईप 2 मधुमेह,
◦ धमनीकाठिन्यता,
◦ स्त्रियांमधील मासिक स्त्रावासंबंधी विकृती, अनार्तवता,
◦ संधिवात,
◦ मानसिक तणाव,
◦ पाठदुखी (Back pain),
◦ अनेक प्रकारचे कॅन्सरला स्थुलता हे कारण ठरते,
◦ पित्ताशयाचे विकार, पित्ताशयात खडे होणे,
◦ पक्षाघात (Stroke) ह्यासारखे विकार अतिस्थुलतेमुळे होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी स्थुलतेवर वेळीच उपचार योजने आवश्यक असते.

स्थुलता आणि BMI –
स्थुलतेचे प्रमाण BMI (Body Mass Index) द्वारे मोजले जाते.
BMI नुसार उंची आणि वजनाचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार आपले वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात आहे की नाही, याचे ज्ञान BMI नुसार होण्यास मदत होते.

◦ जेंव्हा BMI हा 25.0 ते 29.9 पर्यंत असतो तेंव्हा त्याला सामान्यापेक्षा वजन जास्त आहे असे मानले जाते.
◦ तर 30.0 ते 39.9 पर्यंत BMI असल्यास त्याला स्थुलता असे मानले जाते.
◦ तर 40 पेक्षा अधिक BMI दर्शवत असल्यास त्याला अतिस्थुलता असे मानले जाते.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :