लठ्ठपणाचे निदान कसे केले जाते

366
views

Obesity Diagnosis in Marathi [स्थुलता निदान पद्धती] –
स्थुलतेचे निदान कसे करतात
पेशंट हिस्ट्री, शारिरीक तपासणीद्वारे स्थुलतेच्या निदानास सुरवात केली जाते.
◦ वजन आणि उंचीचे प्रमाण तपासले जाते.
◦ यासाठी BMI पद्धतीचा आधार घेतला जातो.
◦ कंबरेचा घेर मापला जातो.

स्थुलतेचे प्रमाण BMI (Body Mass Index) द्वारे मोजले जाते.
BMI नुसार उंची आणि वजनाचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार आपले वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात आहे की नाही, याचे ज्ञान BMI नुसार होण्यास मदत होते.

◦ जेंव्हा BMI हा 25.0 ते 29.9 पर्यंत असतो तेंव्हा त्याला सामान्यापेक्षा वजन जास्त आहे असे मानले जाते.
◦ तर 30.0 ते 39.9 पर्यंत BMI असल्यास त्याला स्थुलता असे मानले जाते.
◦ तर 40 पेक्षा अधिक BMI दर्शवत असल्यास त्याला अतिस्थुलता असे मानले जाते.

कंबरेचा घेर आणि स्थुलता –
पोटाजवळील चरबी अतिप्रमाणात वाढल्यास खालील विकार होण्याचा धोका अधिक वाढतो.
◦ हृद्यविकार उद्भवतात,
◦ उच्च रक्तदाब होणे,
◦ टाईप 2 मधुमेह होतो.

यासाठी पुरुषांचा कंबरेचा घेर हा 40 इंच किंवा 100 सेमी पेक्षा जास्त असू नये तर स्त्रियांचा कंबरेचा घेर हा 35 इंच किंवा 88 सेमी पेक्षा जास्त असू नये.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :